Home /News /coronavirus-latest-news /

आता कोरोनाला रोखणं दूर नाही! 'IIT दिल्ली'तील संशोधनातून 'या' गोष्टी समोर

आता कोरोनाला रोखणं दूर नाही! 'IIT दिल्ली'तील संशोधनातून 'या' गोष्टी समोर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

आयआयटी दिल्लीतल्या (IIT Delhi) संशोधकांनी मानवी शरीरात कोरोना विषाणूच्या (Sars-Cov-2) उत्क्रांतीचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून कोविड-19 (Covid-19) विषाणूचा विकास, रोगप्रतिकारक शक्तीपासून बचाव करण्याची त्याची क्षमता आणि या विषाणूच्या विविध व्हॅरिएंटच्या उत्पत्तीचं गूढ उकलण्यास मदत होऊ शकते, असा दावा केला जात आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 30 मे : कोरोनामुळे (Corona Virus) गेल्या दोन वर्षांत सर्वांचंच खूप नुकसान झालं. आर्थिक, कौटुंबिक, भावनिक सर्वच पातळ्यांवर कोरोनाने माणसाचे हाल केले. कोरोनाचा उगम कसा झाला, त्याचा संसर्ग कसा वाढला आणि त्यानंतर कोरोनाची लक्षणं, त्याचे व्हॅरिएंट्स, त्यावरच्या विविध उपाययोजना या सर्वांबद्दल आतापर्यंत बरंच संशोधन झालं आहे. (Research On Corona) हे संशोधन अजूनही सुरू आहे. आता 'आयआयटी दिल्ली'लादेखील (Indian Institute Of Technology Delhi) आपल्या एका संशोधनामध्ये कोरोनाविषयी आणखी नवी माहिती सापडली आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. आयआयटी दिल्लीतल्या संशोधकांनी मानवी शरीरात कोरोना विषाणूच्या (Sars-Cov-2) उत्क्रांतीचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून कोविड-19 (Covid-19) विषाणूचा विकास, रोगप्रतिकारक शक्तीपासून बचाव करण्याची त्याची क्षमता आणि या विषाणूच्या विविध व्हॅरिएंटच्या उत्पत्तीचं गूढ उकलण्यास मदत होऊ शकते, असा दावा केला जात आहे. मानवामध्ये विषाणूच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्या या टीममध्ये सात सदस्यांचा समावेश आहे. या टीमच्या मते, विषाणूच्या जीनोममधला 'सीपीजी' (CpG) हा क्रमांक व्हायरसचं म्यूटेशन, रोगप्रतिकारक शक्तीचं रक्षण आणि रोग निर्माण करण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे (Ability Of The Virus To Evade The Immune System And The production Of Its Variants). डिस्काऊंटच्या नादात दातांवर उपचारासाठी परदेशात गेली; तोंड उघडताच हादरली महिला संशोधकांना असं आढळून आलं, की मानवी शरीरात विषाणूची उत्पत्ती झाल्यानंतर, Sars-Cov-2 जीनोममधून सीपीजी कमी होण्याचा दर काही महिन्यांनी झपाट्याने कमी होतो. आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर मनोज मेनन (Professor Manoj Menon of IIT Delhi) यांच्या मते, ही एक प्रकारे नवीन माहिती आहे, जी भविष्यात खूप मदत करू शकते. मनोज मेनन म्हणाले, "आम्ही कोरोना उद्रेकाच्या पहिल्या 17 महिन्यांत 17 कोटींहून अधिक मानवी संसर्गांमध्ये व्हायरस जीनोममध्ये कमी होणाऱ्या सीपीजीचा अभ्यास केला." ते पुढे म्हणाले, की ज्यामुळे सीपीजी कमी होतो, असा व्हायरस आणि मानवी शरीरात होणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्यांचा भविष्यात अभ्यास करण्यासाठी आमचं संशोधन आवश्यक रूपरेषा तयार करते. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, हे संशोधन मॉलिक्युलर बायोलॉजी अँड इव्होल्यूशन या जर्नलमध्ये (Journal Of Molecular Biology And Evolution) प्रकाशित झालं आहे आणि याला "The Slowing Rate O CpG Depletion In SARS-CoV-2 Genomes Is Consistent With Adaptations To The Human Host" असे शीर्षक आहे.
    First published:

    Tags: Corona updates, IIT

    पुढील बातम्या