मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

आम्हाला Covid-19 ची लस मिळाली, आता पुढे काय? काय आहेत साइड इफेक्ट्स?

आम्हाला Covid-19 ची लस मिळाली, आता पुढे काय? काय आहेत साइड इफेक्ट्स?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत Home Isolationचे नवे नियम; या गाईडलाईन्स पाळा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत Home Isolationचे नवे नियम; या गाईडलाईन्स पाळा

ब्रिटनमध्ये कोरोनाची लस (Covid-19 vaccine) द्यायला सुरुवात झाली आहे. भारतातही काही दिवसात लसीकरणाला सुरुवात होईल. पण लस घेतल्यावर नेमकं काय होतं? साइड इफेक्ट्स कोणते? लशीनंतरचं आयुष्य कसं असेल अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं…

लंडन, 8 डिसेंबर : फायझर (Pfizer) आणि बायोएनटेक (Biontech) यांनी तयार केलेली covid-19ची लस नागरिकांना देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला आहे. मंगळवारी ही लस द्यायला सुरुवात करण्यात आली. भारतातही लवकरच कोरोना लस (Corona Vaccine) उपलब्ध होणार आहे. पहिली लस कुणाला मिळेल, त्याचं वितरण कसं असेल याचा प्लॅनही मोदी सरकारने तयार केला आहे. सुरुवातीला एक कोटी जनतेला लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. पण आता लस मिळाल्यावर पुढे काय असा प्रश्न मनात आला असेल ना? लशीनंतर काय परिणाम होतो? नॉर्मल आयुष्य जगता येतं का? काही साइड इफेक्ट्स आहेत का? या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न... ब्रिटनने लसीकरणाला मंगळवारपासूनच सुरुवात केली आहे. सुरुवातीला सुमारे 50 रूग्णालयांत लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.त्या देशाच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (National Health service) सांगितलं की पहिल्यांदा 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना, आरोग्य सेवा कर्मचारी आणि नर्सिंग होम कर्मचारी व रहिवासी यांना ही लस देण्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे, असं रॉयटर्सच्या बातमीत म्हटलं आहे. ही लस मिळालेल्यांच्या मनांतील प्रश्नाचीं ही उत्तरं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला लस दिली जाईल तेव्हा काय होईल? ही लस न्यू मेसेंजर RNA टेक्नॉलॉजी तसेच कोरोना विषाणूचा जेनेटिक कोड यांचा वापर करून तयार केलेली आहे. तसेच ही हाताच्या दंडावर देण्यात येणार आहे. ही लस 95% गुणकारी आहे तसेच तीन आठवड्याच्या अंतराने दुसरा डोस दिला जाणार आहे. फायझरने असे म्हटले आहे की चाचणीमध्ये व्हॉलेंटियर्सवर या लशीचे दुष्परिणाम अगदीच कमी प्रमाणात दिसले. तसेच दुसऱ्या डोसनंतर सर्वात जास्त दुष्पपरिणाम आढळून आले 3.8% लोकांना थकवा आणि 2% लोकांना डोकेदुखी जाणवली. ज्येष्ठांना ताप आणि इतर लक्षणं जाणवली. कोरोना लशीचं वितरण करणार कॉम्प्युटर; असा आहे मोदी सरकारचा CO-WIN प्लॅन ही लस कोणत्या प्रकारचे संरक्षण देते? ही लस घेतल्यानंतर ती दुसरा डोस दिल्यानंतर सात दिवसांनी कोरोना विषाणूपासून माणसाचा बचाव करते. ही वेळ येईपर्यंत पहिला डोस देऊन महिना होत आलेला असतो. एकदा लस दिलेल्या व्यक्तीपासून संसर्ग पसरू शकतो की नाही याबाबतीत आतापर्यंत क्लिनिकल चाचण्यांतून काहीच सिद्ध झालेलं नाही. हिपिटायटीस ए सारख्या लसी या संदर्भात प्रतिकार शक्ती वाढवणे इतपत काम करतात. परंतु इतर लसी तसे करत नाहीत. तसेच दिलेल्या औषधांमुळे लोक आजारी पडत नाहीत का हे व्हॅक्सिन निर्मात्या कंपन्या शोधून काढत आहेत. लसीकरण एखाद्यास कोरोना व्हायरस संसर्गापासून पासून किती काळ सुरक्षित ठेवेल हे स्पष्ट होण्यासाठी आणखीन काही महिने जातील. जॉन हॉपकिन्स ब्ल्यूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ मधील संसर्गजन्य रोगतज्ञ डॉक्टर अनिता शेठ यांनी सांगितले की " जोपर्यंत लशीचा परिणामाची योग्य माहिती मिळत नाही तोपर्यंत लोकांनी पबमध्ये जाणे किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमात जाण्याचे टाळले पाहिजे". फक्त एका टी-शर्टच्या किमतीत मोदी सरकारला मिळणार कोरोना लस; सीरमनं ठरवली किंमत लस आल्यानंतर आपण पुन्हा पूर्वीसारखे आयुष्य जगू शकतो का? आतापर्यंत जितक्या लसींबाबतीत बोलले गेले त्या फक्त प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. तसेच कुठलीही लस 100 टक्के प्रभावी असल्याचे पुरावे अजूनही आपल्याकडे नसल्यामुळे मास्क घालणे हात धुणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे हेच सध्यातरी यावरचे अधिक चांगले उपाय आहेत. म्हणजे लस घेतल्यानंतरही हे उपाय करायलाच हवेत. कोलोरॅडोच्या यूसी हेल्थमधील इन्फेक्शन प्रीव्हेन्शन विभागाचे वरिष्ठ वैद्यकीय संचालक डॉक्टर मिशेल बॅरन यांनी सांगितले की, लसीचा परिणाम हा काही रुग्णांवर चांगला होत आहे तर काही रुग्णांवर इतका प्रभावीपणे होत नाही. याचा अर्थ तुम्ही विमानातून प्रवास करायला मोकळे आहात किंवा तुमच्या घरी 30 जणांना बोलवून पार्टी करायला मोकळे झालात असा आहे का? तर त्याचं उत्तर नक्कीच नाही असं आहे. तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. तसेच त्यांनी सांगितले की उन्हाळ्यापर्यंत लसीकरण मोहीमेच्या माध्यमातून ब्रिटनमधील सामान्य जनांना लस मिळण्याची शक्यता आहे.
First published:

पुढील बातम्या