कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या भविष्याचं काय? मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांचा मोठा हात

कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या भविष्याचं काय? मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांचा मोठा हात

कोविडमुळे (Covid19) आई-वडील मरण पावल्यामुळे अनेक मुलं अनाथ (Orphans) होत असल्याच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना पाहायला मिळत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मे : कोविडमुळे (Covid19) आई-वडील मरण पावल्यामुळे अनेक मुलं अनाथ (Orphans) होत असल्याच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना पाहायला मिळत आहेत. अशा प्रसंगांमुळे चाइल्ड केअर सेंटर्स (Child Care Centers), स्वयंसेवी संस्था (NGO),चाइल्ड हेल्पलाइन (Child Helpline)आदींकडे मोठ्या संख्येने कॉल्स येत आहेत.

अशा स्थितीत आपण नेमकं काय करायचं, कुठे जायचं हे न कळल्यामुळे मुलं तीव्र मानसिक ताणात आहेत. या मुलांची काळजी कोण घेऊ शकेल, याबद्दल विचारणा करण्यासाठी त्यांचे शेजारी, नातेवाईक आदींकडून हेल्पलाइनला फोन केले जात आहेत. बंगळुरूच्या चाइल्ड राइट्स ट्रस्टचे संचालक नागसिंह राव यांना बेंगळुरू (Bengaluru),तसंच राज्याच्या (Karnataka) अन्य भागांतूनही अशा मुलांबद्दल माहिती देणारे फोन आले. आई-वडील दोघंही कोरोनामुळे गेल्यानंतर आजूबाजूला काय घडतंय ते मुलांना समजेनासंच झालं आहे. अनेक घटनांमध्ये असं पुढे आलं आहे, की या मुलांचे आजी-आजोबा स्वतःहून सांगत आहेत, की आम्ही नातवंडांना सांभाळण्यास असमर्थ आहोत. कारण आम्हाला स्वतःच्या जगण्यासाठीच संघर्ष करावा लागणार आहे. राव यांनी एका सहा महिन्यांच्या बाळाचं उदाहरण दिलं. त्या बाळाचे आई-वडील कोरोनामुळे गेले. त्यांचा एक दूरचा नातेवाईक त्या बाळाला दत्तक घेऊ इच्छितो; मात्र त्यासाठीच्या कारा गाइडलाइन्सनुसार दीर्घ प्रक्रियेतून त्यांना जावं लागेल.

हे ही वाचा-वदनी कवळ घेता...'म्हटल्याशिवाय जेवत नाही;कुत्र्यांचा VIDEO पाहून वाटेल कमाल!

अशा घटनांमुळे मुलांच्या तस्करीचा धोकाही त्यांनी व्यक्त केला.  1098 चाइल्ड हेल्पलाइनचं दक्षिणेतलं मुख्यालय आता चेन्नईत आहे. त्यामुळे अशा स्थितीत एवढ्या दुरुन मार्गदर्शक करणं, अशा केसेस हाताळणं त्यांनाही अवघड होतंय. सामाजिक कार्यकर्त्या वृंदा आडिगा यांनी ही माहिती दिली. त्यांनाही कर्नाटक राज्याच्या अनेक भागांतून असे कॉल्स येत आहेत. लोकांच्या विशिष्ट गरजांनुसार काम करण्यासाठी हेल्पलाइन्सचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे.  सध्याची परिस्थिती प्रत्येकासाठीच नवी आहे. प्रत्येक वेळी जेव्हा विशिष्ट गरज असलेली केस पुढे येते, तेव्हा महिला-बालकल्याण विभाग त्यांच्या स्टँडर्डऑपरेटिंग प्रोसीजरमध्ये त्या मुद्द्याचा समावेश करतो. कारण मुलांची सुरक्षितता हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असतो, असं आडिगा म्हणतात.

बेंगळुरूतल्या शेषाद्रीपुरममधल्या एका प्रकरणात तीन आणि पाच वर्षांची मुलं घरी एकटी पडली होती. कारण त्यांच्या आई-वडिलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या सुदैवाने दूरच्या एका नातेवाईकाने त्यांचे आई-वडील सुखरूप घरीयेईपर्यंत त्यांची काळजी घेतली. पण अशी अनेक प्रकरणं आहेत,की शेजारी किंवा नातेवाईकांचे फोन आल्यावर मुलांना चाइल्ड केअर सेंटरमध्ये पाठवलं जातं. अशा मुलांची सोय करणं अवघड असतं. कारण एक तर त्यांनाही संसर्ग (Infection)झाला असल्याची शक्यता असते. त्यांना केंद्रात दाखल करून घेतलं,तर केंद्रातल्या बाकीच्या निरोगी मुलांना संसर्गाचा धोका असतो. तरीही आतापर्यंत आमच्याकडे पोहोचलेल्या मुलांना सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत, असं डॉ. फातिमा यांनी सांगितलं. त्या अनेकस्वयंसेवी संस्थासोबत काम करतात.  छोट्या, न्यूक्लिअर कुटुंबांमधल्या (Nuclear Families)मुलांची समस्या मोठी आहे. कारण कुटुंबातल्या बाकीच्या व्यक्तींशी त्यांची तितकीशी जवळीक नसते. ही परिस्थिती अगदीच अनपेक्षित आहे. ही मुलं नेमक्या कोणत्या परिस्थितीतून जात असतील, त्याचं वर्णन करणं अवघड आहे. टीनएजर्स ही परिस्थिती नाकारत असतील, तसंच प्रचंड दुःखात असतील. ती विचित्र वागू लागतात. त्यातच मुलं कोरोना पॉझिटिव्ह असली, तर नातेवाईकही जवळ येत नाहीत. त्यामुळे मुलांना अचानक आपणजगात एकटे आहोत असं वाटू लागतं. त्यातून ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. त्यांना उभारी देणं, मानसिकदृष्ट्या मदत करणं आणि त्याचा दीर्घकालीन फॉलोअपया गोष्टी आवश्यक असल्याचं बेंगळुरूतल्या विजयनगरमधले सायकिअॅट्रिस्ट डॉ.विजय सांगतात.  सध्याची परिस्थिती पाहता लोकांना शेजाऱ्यापाजाऱ्यांचं, तसंच समाजात अन्य लोकांशी चांगले संबंध ठेवण्याचं महत्त्व जाणवू लागलं आहे. कारण अशा स्थितीत कदाचित नातेवाईक लगेच पोहोचू शकत नसले,तर आजूबाजूची मंडळीच उपयोगी पडतात, असं डॉ. विजय म्हणाले.

First published: May 4, 2021, 7:45 AM IST

ताज्या बातम्या