देशात 16 जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा कंदील दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज ही मोठी घोषणा केली आहे. याचे पडसाद अर्थातच येऊ घातलेल्या निवडणुकींवर होणार आहेत. भाजप विरुद्ध तृणमूल अशी चुरशीची लढत असताना ममता बॅनर्जींचा हा निर्णय पुन्हा एकदा पश्चिम बंगालचा गड राखण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. पश्चिम बंगालमध्ये कधी होणार निवडणुका? साधारण पश्चिम बंगालमध्ये मार्च ते एप्रिल 2021 दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगानं या संदर्भात अद्याप तारखा जाहीर केल्या नाहीत. मात्र तिथे प्रचाराचा जोर आणि रणधुमाळी रंगात आली आहे. लोकसभा निवडणुकीला भाजपने तृणमूल काँग्रेसला टफ फाइट दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी देखील कंबर कसली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पश्चिम बंगाल दौऱ्यावर स्वत: प्रचारासाठी देखील गेले होते. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी एकूण 294 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 148 जागा जिंकण आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणानंतर आता पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ झाली आहे. याचा फायदा भाजप उचलणार का? भाजप कशा पद्धतीनं पुढची दिशा ठरवणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.I am happy to announce that our government is making arrangements to facilitate the administration of #COVID19 vaccine to all the people of the state without any cost: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/I2Y9DvbHeo
— ANI (@ANI) January 10, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, BJP, Mamata banerjee, PM Naredra Modi