मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनानं आठवडाभरात आईसह दोन भावांचा अंत, संसार उघड्यावर पडले, रुग्णालयानं दाखवली माणुसकी

कोरोनानं आठवडाभरात आईसह दोन भावांचा अंत, संसार उघड्यावर पडले, रुग्णालयानं दाखवली माणुसकी

Wardha family shocked by 3 corona deaths - रुग्णालयाला ही घटना कळताच भरलेले पैसे परत देण्याचा निर्णय घेतला आणि शेंडे कुटुंबाला 50 हजार रुपये परत करत सामाजिक दायित्व जपलं आहे.

Wardha family shocked by 3 corona deaths - रुग्णालयाला ही घटना कळताच भरलेले पैसे परत देण्याचा निर्णय घेतला आणि शेंडे कुटुंबाला 50 हजार रुपये परत करत सामाजिक दायित्व जपलं आहे.

Wardha family shocked by 3 corona deaths - रुग्णालयाला ही घटना कळताच भरलेले पैसे परत देण्याचा निर्णय घेतला आणि शेंडे कुटुंबाला 50 हजार रुपये परत करत सामाजिक दायित्व जपलं आहे.

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 30 मे: कोरोनाने (Coronavirus) आतापर्यंत अनेक कुटुंबं उध्वस्त केली आहेत. वर्धा जिल्ह्याच्या (Wardha) सेलू (Selu) तालुक्यात राहणाऱ्या शेंडे कुटुंबाच्या बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडली. एकापाठोपाठ घरातील दोन कर्ते मुलं आणि आईनं जगाचा निरोप (mother and two brother died in family) घेतला. त्यामुळं या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसलळा आहे. चार चिमुकल्यांसह केवळ दोन महिलांच्या खांद्यावर संसाराचं ओझं येऊन पडलं आहे. अशा संकटाच्या काळात किमान रुग्णालयानं या कुटुंबाला दिलासा दिला. कुटुंबावर एवढा मोठा आघात झाल्यानं, उपचारासाठी फरलेले पैसे परत करत रुग्णालय प्रशासनानं माणुसकी दाखवून दिली.

(वाचा-सरकार तुमचं WhatsApp चॅट वाचू शकणार? वाचा 3 रेड टिकमागच्या व्हायरल मेसेजचं सत्य)

वर्धा येथील शेंडे कुटुंबासाठी गेला आठवडा जणू दुर्दैवाचा घेरा लागल्यासारखा ठरला. या कुटुंबातील दोन सख्खे भाऊ आणि आईचा कोरोनानं अंत झाला. एकाच आठवड्यात होत्याचं नव्हतं झालं. वर्ध्याच्या सेलूमध्ये शेंडे कुटुंबीय राहत होते. आई, दोन विवाहित मुलं आणि त्यांचा भरलेला संसार. सर्वकाही व्यवस्थित असताना कोरोनाची नजर कुटुंबाला लागली. आधी कुटुंबातील मोठा मुलगा कैलास आणि आई उषा यांना कोरोनाची लागण झाली. या दोघांनाही नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. पण उपचार सुरु असतांनाच आधी मुलाचा आणि दोन दिवसांनी आईचा मृत्यू झाला. या दुःखातून सावरण्याआधीच धाकट्या भावालाही कोरोनाची लागण झाली आणि त्याचाही सावंगीमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

(वाचा-दहावीच्या परीक्षेचं खूळ डोक्यातून काढा, नाहीतर ठार मारू; याचिकाकर्त्याला धमकी)

घरातील दोन कर्ते पुरुष आणि आई यांच्या निधनाने चार छोटी मुलं आणि दोघी जावांचा संसार उघड्यावर आलाय. मृ पावलेला मोठा मुलगा कैलास वर्ध्यातील खासगी बँकेत तर छोटा मुलगा कृषी उत्पन्न बाजार समितीत मापारी म्हणून काम करायचा. कैलास यांच्या मागे पत्नी, एक आठ वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे. तर विलास यांच्या पश्चात पत्नी एक पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी आहे. या कुटुंबाचं काय होणार या विचारानंच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

या सर्व निराशाजनक स्थितीमध्ये आचार्य विनोबा भावे रुग्णालयानं माणुसकी दाखवली आहे. विलास शेंडे यांनी उपचारासाठी रुग्णालयात पैसे जमा केले होते. पण एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानं रुग्णालय प्रशासनालाही धक्का बसला. त्यांनी संपूर्ण पैसे शेंडे कुटुंबाला परत केले. रुग्णालयाला ही घटना कळताच भरलेले पैसे परत देण्याचा निर्णय घेतला आणि शेंडे कुटुंबाला 50 हजार रुपये परत करत सामाजिक दायित्व जपलं आहे.

कुटुंबातील कर्ते गमावल्यानंतर पैशाचं काय असा मुद्दा असला तरी, आता या कुटुंबाला मानसिक आधाराबरोबरच आर्थिक मदतीची प्रचंड गरज असणार आहे. त्याची सुरुवात या रुग्णालयानं केली असं म्हणायला हरकत नाही. सर्व रुग्णालयांनी अशाप्रकारे माणुसकी जपली तर लोकांचा वैद्यकीय यंत्रणेवरील विश्वास नक्की आणखी दृढ होईल.

First published:

Tags: Coronavirus, Death, Wardha news