कोरोना इतकेच भयंकर आहेत 'हे' 4 आजार, घेतला कोट्यावधी लोकांचा जीव

कोरोना इतकेच भयंकर आहेत 'हे' 4 आजार, घेतला कोट्यावधी लोकांचा जीव

संपूर्ण जगभरात सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र जगावर आलेलं पाहिलंच संकट नाही.

  • Share this:

संपूर्ण जगभरात सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आतापर्यंत लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतातदेखील आतापर्यंत एक लाख नागरिकांचा मृत्यू झाला असून, दररोज हजारोंच्या संख्येने रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हे काही जगावर आलेलं पाहिलंच संकट नाही. याआधीदेखील अशा प्रकारचे अनेक संकट जगभरातील अनेक देशांमध्ये येऊन गेली आहेत. आज आपण या काही आजारांवर नजर टाकणार आहोत.

1) Ebola

2013 ते 2016 दरम्यान इबोलाचा उद्रेक झाला होता. पश्चिम आफ्रिकेत या विषाणूचा संसर्ग झालेल्या सुमारे 90 टक्क्यांहून अधिक लोकांचा बळी गेला. हा इबोला सर्वात प्राणघातक विषाणू मानला जात होता. इबोलात पहिली जी लक्षणे दिसतात ती फ्लू सारखीच असतात. त्यानंतर उलट्या, डायरिया, कमी रक्तदाब दिसून येतो. त्यानंतर रक्तस्राव झाल्यानं मोठ्या प्रमाणात रुग्णांना त्रास होतो. सिएरा लिओन, गिनी या देशांमध्ये सुरुवातीला तो पसरला होता.

2) HIV/AIDS

एचआयव्ही म्हणजे ह्युमन इम्युनोडिफेशिअन्सी व्हायरस, ज्यामुळे एड्स अर्थात अक्वायर्ड इम्युनोडेफेशिअन्सी सिंड्रोम होतो. हा विषाणू सामान्यपणे लैंगिक संबंधांतून, संक्रमित सुईद्वारे रक्तामार्फत आणि एखाद्या संक्रमित गरोदर आईकडून बाळाला होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार जगभरात दक्षिण आफ्रिकेत या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जवळपास 7 कोटी नागरिकांना याचं संक्रमण झालं होतं. 1981 पासून आतापर्यंत जगभरात 35 कोटी नागरिकांचा एड्समुळे मृत्यू झाला आहे.

3) SARS-CoV Outbreak

Severe acute respiratory syndrome हा आजार सुरुवातीला आशिया आणि कॅनडामध्ये 2002-2003 मध्ये आढळून आला होता. कोरोना व्हायरसचाच हा एक प्रकार असून जगभरातील जवळपास 37 देशांमध्ये हा पसरला होता. यामध्ये व्यक्तीला ताप, अंगदुखी आणि न्यूमोनियासारखी लक्षणं दिसून येतात. या आजाराचं मूळ हॉंगकॉंगमध्ये 2002 मध्ये आढळून आलं होतं. त्यानंतर संपूर्ण जगभरात याचा प्रसार झाला होता.

4) Hepatitis

Hepatitis या आजाराचे पाच प्रकार असतात. यामध्ये A, B, C, D, E असे याचे पाच प्रकार असून B आणि C या प्रकारांमुळेच जगभरात सर्वांत जास्त मृत्यू होतात. जवळपास 96 टक्के मृत्यू हे या दोन प्रकारांमुळेच होतात. या घातक आजारामुळं 2015 मध्ये जगभरात 1 कोटी 35 लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता. मोठ्या प्रमाणात hepatitis C या आजाराची लागण जगभरातील 4.4% नागरिकांना होत असते.

Published by: Priyanka Gawde
First published: October 5, 2020, 1:22 PM IST

ताज्या बातम्या