मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोना टेस्टसाठी नववधूचा पदर हटवण्यावरून झाला राडा, गावकऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना बेदम मारलं

कोरोना टेस्टसाठी नववधूचा पदर हटवण्यावरून झाला राडा, गावकऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना बेदम मारलं

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

कोरोना तपासणी केंद्रावर एक नववधू (Newly married girl) आपली तपासणी करून घ्यायला आली होती. कोरोनासाठी नाकातील स्रावाचं सॅम्पल घेतलं जातं. त्यामुळे लॅब टेक्निशियन सौरभ अत्री याने त्या नववधूला तिच्या डोक्यावर असलेला पदर बाजूला करायला सांगितलं.

पुढे वाचा ...

लखनऊ 18 मे : सरकारनी हे करायला हवं होतं, सरकारनी ते करायला हवं होतं, असे सल्ले देणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला असतात. आपणही कधीकधी पंतप्रधानांच्या चुका काढायला पुढे असतो. मात्र, प्रत्यक्ष देशातील नागरिकांना सुविधा पुरवणं हे काम किती जिकिरीचं असतं हे सरकारी कर्मचारीच जाणतात. सध्या कोरोना महामारीचा संसर्ग वाढत आहे, त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार (Uttar Pradesh) अगदी सतर्कतेने काम करत आहे. आरोग्य विभागाला सुसज्ज उपकरणं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसंच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना खेड्यापाड्यांत घरोघरी जाऊन नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

आरोग्य विभागाचे अधिकारी (UP Health Department) अलीगढ जिल्ह्यातल्या टप्पल (Tappal) परिसरातील साहा नगर सोरौला या गावात गेले. त्यांनी कोरोना (Covid-19) तपासणी केंद्रावर गावकऱ्यांना बोलवलं आणि त्यांची तपासणी केली. 37 हून अधिक महिला आणि पुरुषांची कोरोना चाचणी करण्यात आली. तोपर्यंत गावकऱ्यांनी या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खूप सहकार्य केलं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. या टीमने अँटिजेन टेस्ट केल्या आणि सॅम्पल घेतले. त्यातच अचानक गावकऱ्यांनी या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मारायला सुरुवात केली. त्यांच्याकडची कागदपत्रं फाडून टाकली आणि त्यांच्य पाठीमागे धावत त्यांना मारहाण केली. या सगळ्या प्रकारात दोन कर्मचारी जखमीही झाले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांत (Police) तक्रार दाखल केली. याबाबतचं वृत्त आजतकने दिलं आहे.

असं काय झालं, की शांत गावकरी एकाएकी इतके चिडले. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की कोरोना तपासणी केंद्रावर एक नववधू (Newly married girl) आपली तपासणी करून घ्यायला आली होती. कोरोनासाठी नाकातील स्रावाचं सॅम्पल घेतलं जातं. त्यामुळे लॅब टेक्निशियन सौरभ अत्री याने त्या नववधूला तिच्या डोक्यावर असलेला पदर बाजूला करायला सांगितलं. पण त्या केंद्रात गावातील ज्येष्ठ मंडळी आणि काही तरुणही उभे होते, त्यामुळे लाजलेली ती नववधू पदर बाजूला करायला तयार नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गावातील ज्येष्ठ मंडळींना (Senior Citizens) तिथून जायची विनंती केली आणि सगळेच चिडले.

ज्येष्ठांचा अपमान केल्याच्या भावनेने पेटून उठलेल्या तरुणांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली. या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या हातचा चोप खावा लागला. त्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टप्पल पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल केली. सरकारी कर्मचाऱ्यांना असेही अनुभव येत असतात त्यामुळे त्यांचंही काम सोपं नसतं.

First published:

Tags: Corona patient, Coronavirus, Crime news