Home /News /coronavirus-latest-news /

धन्य! PPE किट घालून अखेर लग्न उरकलंच, एक दिवस आधी नवरदेवाचा कोरोना रिपोर्ट होता Positive

धन्य! PPE किट घालून अखेर लग्न उरकलंच, एक दिवस आधी नवरदेवाचा कोरोना रिपोर्ट होता Positive

मध्यप्रदेशात एक घटना अशी घडली आहे की नवरा-बायकोनं लग्न ठरल्या तारखेलाच करण्याचा अट्टहास केला आहे आणि ते देखील खुद्द नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) येऊन सुद्धा! या लग्नाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

    रतलाम, 27 एप्रिल: गेल्यावर्षी 2020 मध्ये कोरोना लॉकडाऊन काळात (Coronavirus Lockdown) अनेकांनी 'ऑनलाइन शुभमंगल' उरकलं. वऱ्हाडी व्हिडीओ कॉलवर असलेला लग्नसोहळा, नवरा एकीकडे अन् नवरी एकीकडे इ. असे काही विवाहसोहळे गेल्यावर्षाने अनुभवले. याहीवर्षी कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. नातलगांना बोलावता येत नाही आहे, त्यामुळे अनेकांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. मात्र मध्यप्रदेशात (Madhya Pradesh News) एक घटना अशी घडली आहे की नवरा-बायकोनं लग्न ठरल्या तारखेलाच करण्याचा अट्टहास केला आहे आणि ते देखील खुद्द नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) येऊन सुद्धा! या लग्नाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये नवरा बायकोने लग्नाच्या पोषाखाऐवजी चक्क पीपीई सुट्स परिधान केले आहे. यावेळी उपस्थित असणाऱ्या लोकांनी देखील पीपीई किट परिधान केले आहे. दरम्यान रतलामच्या तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 एप्रिल रोजी नवरदेवाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. लग्न थांबवण्यासाठी ते त्याठिकाणी पोहोचले होते, पण त्यांनी विनंती केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा पार पडला. या जोडप्याला पीपीई किट्स घालण्यास सांगण्यात आले जेणेकरून संक्रमण होणार नाही. सोशल मीडियावर या व्हिडीओवर आणि तहसीलदारांच्या उत्तरावर अनेकांनी टीका केली आहे. या दाम्पत्यांने काही काळ थांबून लग्न सोहळा करायला हवा होता, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे तहसीलदारांच्या अशाप्रकारच्या निर्णयावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Madhya pradesh

    पुढील बातम्या