VIDEO: 'मी अग्नीला साक्षी मानून...',नियम शिथिल होताच मद्यप्रेमीने दारुच्या दुकानासमोर घातला पुजेचा घाट

VIDEO: 'मी अग्नीला साक्षी मानून...',नियम शिथिल होताच मद्यप्रेमीने दारुच्या दुकानासमोर घातला पुजेचा घाट

दारुची खुली दुकाने पाहताच या मद्यप्रेमीला आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.

  • Share this:

15 जून: तामिळनाडूमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध शिथिल केले आहेत. आता सरकारने तेथे दारूची दुकाने खुली करण्याचीही परवानगी दिली आहे. या दुकानांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले असून सोमवारपासून खुले करण्यात आले आहे. दारूची दुकाने खुली होताच पिणाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. दुकानांमध्ये मोठी रांग पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमध्ये येथे दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाल्याने लॉकडाऊन शिथिल केला आणि दारूची दुकाने खुली केल्यामुळे पिणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

याच्याशी संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील एक व्यक्ती दारूची दुकानं खुली झाल्यामुळे इतका आनंदी झाला आहे की, त्याने चक्क दारूच्या दुकानाबाहेर दिवाच पेटवला. त्यानंतर काऊंटरवर जाऊन दोन बाटल्या खरेदी केल्या आणि अग्नी देवतेला दाखवला आणि नमस्कार केला. आणि दारूचा आस्वाद घेतला. हे पाहून दुसरी व्यक्तीदेखील त्याच्या मागून आली आणि ती देखील पुजेत सहभागी झाली.

हे ही वाचा-निलंबनावर निलंबन! DANCE VIDEO व्हायरल होताच वरिष्ठांकडून पुन्हा पोलिसाची शाळा

हा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. तामिळनाडूमध्ये 25 दिवसांनंतर 14 जून रोजी 27 जिल्ह्यांमध्ये सलून, पार्क आणि सरकारी दारूची दुकाने पुन्हा खुली करण्यात आली आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी अशी शिथिलता जाहीर केली होती. तसेच, 21 जूनच्या सकाळपर्यंत काही निर्बंध वाढवले होते. त्यात धार्मिक आणि पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय लॉकडाऊनच्या कालावधीत कोणतीही सार्वजनिक किंवा खाजगी बस सेवा चालविली जाणार नसल्याचं सांगितलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: June 15, 2021, 8:12 AM IST

ताज्या बातम्या