मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोना, ब्लॅक फंगसनंतर आता Aspergillosis Infection चा धोका; 8 रुग्ण सापडल्याने खळबळ

कोरोना, ब्लॅक फंगसनंतर आता Aspergillosis Infection चा धोका; 8 रुग्ण सापडल्याने खळबळ

एस्परगिलोसिस (Nasal Aspergillosis) नावाच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढत आहे. सायनसमध्ये त्याचे संक्रमण होते. या नवीन आजारानं डॉक्टरही आश्चर्यचकित आहेत.

एस्परगिलोसिस (Nasal Aspergillosis) नावाच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढत आहे. सायनसमध्ये त्याचे संक्रमण होते. या नवीन आजारानं डॉक्टरही आश्चर्यचकित आहेत.

एस्परगिलोसिस (Nasal Aspergillosis) नावाच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढत आहे. सायनसमध्ये त्याचे संक्रमण होते. या नवीन आजारानं डॉक्टरही आश्चर्यचकित आहेत.

अहमदाबाद, 27 मे : देशभरात ब्लॅक फंगस, व्हाइट फंगस आणि यलो फंगसचे प्रमाण वाढत असताना आता एक नवीन प्रकारच्या बुरशीजन्य (Fungus) आजारानं लोकांना घाबरवलं आहे. एस्परगिलोसिस (Nasal Aspergillosis) नावाच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढत आहे. गुजरातमध्ये या आजाराचे 8 रुग्ण सापडले आहेत.

वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात या नवीन बुरशीजन्य संसर्गाचे 8 रुग्ण आढळले आहेत ज्यांना गेल्या आठवड्यात दाखल करण्यात आले होतं. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्ण किंवा कोरोनातून बरे झालेल्या लोकांना हे संक्रमण होत आहे. सायनसमध्ये त्याचं संक्रमण होत असल्याने डॉक्टरही आश्चर्यचकित आहेत.

शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या कोविड -19 च्या सल्लागार डॉ. शीतल मिस्त्री यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, एस्परगिलोसिस सामान्यत: इम्युनो-कॉम्प्रोमाइज्ड झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतो, परंतु सायनसमध्ये एस्परगिलोसिस फारच कमी आढळतो.

कोविडपासून बरे झालेले किंवा उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये हा आजार दिसतो. मात्र एस्परगिलोसिस ब्लॅक फंगस (म्यूकोर्मिकोसिस) इतका धोकादायक नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचा - अरे देवा! ब्लॅक, व्हाइट, येलो आणि आता Cream Fungus; कोरोनानंतर बुरशीचं थैमान

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बुरशीजन्य संसर्गाची (ब्लॅक फंगस व इतर) अनेक प्रकरणे समोर येत आहेत, कारण रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉइड्सचा वापर केला जात आहे. तसंच ऑक्सिजन पुरवठा हायड्रेट करण्यासाठी निर्जंतुकीकरण नसलेल्या पाण्याचा उपयोग केल्याचीही शक्यत आहे. त्यामुळं देखील या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली असण्याची शक्यता आहे. एसजीएस रुग्णालयात मल्टी ड्रग्स रेझिस्टन्स यीस्ट इन्फेक्शन कॅंडीडा ऑरिसचीही 13 प्रकरणे समोर आली आहेत. वडोदरामध्ये दोन सरकारी रुग्णालये (एसजीएस आणि गोत्री मेडिकल कॉलेज) मध्ये 262 काळ्या बुरशीच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे वाचा - जगातील सर्वात श्रीमंत पॉपस्टारनं केलं लग्न; लग्नात एकही पाहुणा नव्हता, तरी झाला 100 कोटींचा खर्च

दरम्यान, महाराष्ट्रातही या ब्लॅक फंगस आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. राज्यात कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं कमी होत असल्यानं दिलासा मिळाला आहे, मात्र मृतांची संख्या अद्यापही चिंताजनक आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावेळी सरकारी आकडेवारीनुसार नोंद झालेल्या देखील मृतांची संख्या मोठी आहे. त्यातच आता या वेगवेगळ्या फंगसच्या आजारानं ताप वाढवला आहे.

First published:
top videos

    Tags: Corona spread, Corona updates, Corona vaccination, Coronavirus