मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Updates: दोन खासगी शाळांमध्ये सापडले Corona बाधित विद्यार्थी; शाळेनं घेतला मोठा निर्णय

Corona Updates: दोन खासगी शाळांमध्ये सापडले Corona बाधित विद्यार्थी; शाळेनं घेतला मोठा निर्णय

खासगी शाळांमध्ये (private schools) विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

खासगी शाळांमध्ये (private schools) विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

खासगी शाळांमध्ये (private schools) विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

उत्तर प्रदेश 11 एप्रिल: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडा आणि गाझियाबाद (Noida and Ghaziabad districts) जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये (private schools) विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यानं खळबळ उडाली आहे. यामध्ये गाझियाबादमधील दोन खासगी शाळांमधील पाच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्याचवेळी नोएडातील एका खासगी शाळेतील तीन वर्गात कोविड बाधित विद्यार्थी आढळले आहेत. त्यामुळे वर्ग आता ऑनलाईन चालणार आहेत.

नोएडातील कोरोना संसर्गाच्या घटत्या घटनांमध्ये सेक्टर-40 येथील एका खासगी शाळेतील तीन वर्गातील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. अचानक कोरोना बाधित आढळल्याने लोकांची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाने पालकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार इयत्ता नववी विभाग इ, 12 वी विभाग ब आणि विभाग ड मध्ये काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.

त्यामुळे तिन्ही वर्गांचे ऑफलाइन क्लास 13 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. यासोबतच या तिन्ही वर्गातील पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला RTPCR निगेटिव्ह रिपोर्टसह 18 एप्रिल रोजी शाळेत पाठवा. लक्षणे नसलेल्यांसाठी रॅपिड टेस्ट अनिवार्य आहे. हे तीन वर्ग वगळता उर्वरित वर्ग आणि विभाग सुरळीत चालू राहतील.

Breaking News: केमिकल कंपनीत Blast, 6 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू

उल्लेखनीय आहे की नोएडाला लागून असलेल्या गाझियाबादमध्येही रविवारी कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. शनिवारी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी हा आकडा पाचवर पोहोचला, तर केवळ एका रुग्णाने कोरोनावर मात केली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 30 झाली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्ण धोक्याबाहेर असून त्यांच्यावर होम आयसोलेशनमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा निरिक्षण अधिकारी डॉ.आर.के.गुप्ता म्हणाले की, कोरोना संसर्गाचा धोका पूर्णपणे संपलेला नाही. कोणतीही निष्काळजीपणा संसर्गास उत्तेजन देऊ शकते. यामध्ये प्रत्येकाने आपापल्या स्तरावर सतर्क राहून कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसल्यास त्वरित चाचणी करा. जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील आणि कोरोनाचा संसर्ग पसरण्यापासून रोखता येईल.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases, Uttar pradesh