Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनापासून बचावासाठी गायीच्या शेणाचा फायदा होतो का? डॉक्टरांनी दिलं उत्तर

कोरोनापासून बचावासाठी गायीच्या शेणाचा फायदा होतो का? डॉक्टरांनी दिलं उत्तर

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

कोरोनापासून बचावासाठी लोक गाईचं शेण (Cow Dung ) वापरत आहेत. मात्र, डॉक्टरांनी नागरिकांना असं न करण्याचा सल्ला दिला आहे.

    नवी दिल्ली 11 मे : देशभरात सध्या कोरोनानं (Coronavirus) हाहाकार घातला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी लोक अनेक उपाय करत आहेत. देशातील अनेक भागांमधून अशा बातम्याही समोर येत आहेत, की कोरोनापासून बचावासाठी लोक गाईचं शेण (Cow Dung ) वापरत आहेत. मात्र, डॉक्टरांनी नागरिकांना असं न करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोनापासून बचावासाठी शेणाचा वापर करणाऱ्या लोकांना इतर आजार होऊ शकतात. सोबतच डॉक्टरांनी हेदेखील स्पष्ट केलं आहे, की गाईचं शेण कोरोनापासून बचावासाठी प्रभावी आहे असं वैज्ञानिकांनी आतापर्यंत सांगितलेलं नाही. हिंदू धर्माता गायीला अत्यंत पवित्र समजलं जातं. अनेक वर्षांपासून हिंदू लोक आपलं घर स्वच्छ करण्यासाठी आणि मंदिरांमध्येही गायीच्या शेणाचा वापर करतात. याच पार्श्वभूमीवर सध्या अनेक लोक कोरोनापासून बचावासाठी गौशालेत जात आहेत. आठवड्यातून एकदा याठिकाणी जात लोक शरीरावर शेणाचा आणि गोमूत्राचा लेप लावत आहेत. असं केल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढून कोरोनापासून बचाव होईल, असा त्यांचा समज आहे. गौतम मनिलाल बोरिसा हे एका फार्मास्युटिकल कंपनीत असोसिएट मॅनेजर आहेत. ते गेल्या एका वर्षापासून अशाच एका केंद्राला भेट देत आहेत. त्यांनी म्हटलं, की मी पाहिलंय की डॉक्टरदेखील इथे येतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, असं केल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि कोणत्याही भितीशिवाय ते रुग्णांच्या जवळ जाऊ शकतात. जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ज्ञ लोकांना असं न करण्याचा सल्ला देत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जे ए जयलाल म्हणाले, की या गोष्टींचं सेवन आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे इतर आजार जनावरांमधून माणसांमध्ये येऊ शकतात. याशिवाय लोक अशा ठिकाणांवर एकत्र जमतात. याचाही विपरित परिणाम होऊ शकतो. अशा ठिकाणी कोरोनाचा धोका अधिक असतो.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Coronavirus, Cow science

    पुढील बातम्या