मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

विमान प्रवासादरम्यान महिलेचा रिपोर्ट आला Corona Positive, 5 तास बाथरुममध्ये केलं Isolate

विमान प्रवासादरम्यान महिलेचा रिपोर्ट आला Corona Positive, 5 तास बाथरुममध्ये केलं Isolate

एका महिलेची प्रवासादरम्यान कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Covid Positive) आल्याने तिला फ्लाईटच्या बाथरुममध्ये 5 तास आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

एका महिलेची प्रवासादरम्यान कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Covid Positive) आल्याने तिला फ्लाईटच्या बाथरुममध्ये 5 तास आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

एका महिलेची प्रवासादरम्यान कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Covid Positive) आल्याने तिला फ्लाईटच्या बाथरुममध्ये 5 तास आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

वॉशिंग्टन, 31 डिसेंबर : दोन वर्षांपासून जगात कोरोनाचं (Coronavirus) संकट आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी झाल्यामुळे कोरोनाचे संकट टळले असे वाटत होते. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉन विषाणूने डोकेवर काढले आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूने चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग अधिक गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे विविध देशांमध्ये पुन्हा निर्बंध लावण्यात येत आहेत. प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत असून खबरदारी बाळगण्यात येत आहे. अनेक देशांनी विमानतळावर कोरोना नियम, आयसोलेशन आणि कोविड चाचणी अनिवार्य केली आहे. यातच एका अमेरिकन महिलेची प्रवासादरम्यान कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Covid Positive) आल्याने तिला फ्लाईटच्या बाथरुममध्ये 5 तास आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची घटना घडली.

आधी 7 वेळा टेस्ट निगेटिव्ह, विमानात रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

'द ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, शिकागो ते आईसलँड विमान प्रवासादरम्यान महिलेचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला फ्लाईटच्या बाथरुममध्ये पाच तास आयसोलेनशनमध्ये ठेवण्यात आलं. मारिसा फोटियो असे या महिलेचे नाव आहे. डब्ल्यूएबीसी-टीव्हीला महिलेने माहिती दिली की, तिला 19 डिसेंबरला प्रवासादरम्यान घशात त्रास होत होता. यावेळी खबरदारी म्हणून मी बाथरुममध्ये कोरोना टेस्ट केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तसेच CNN News शी बोलताना महिलेने सांगितले, की विमानतळावर 2 आरटीपीसीआर टेस्ट (RT-PCR Test) आणि 5 वेळा रॅपिड टेस्ट (Rapid Test) करण्यात आली होती. पण हे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र, विमानात बसल्याच्या अडीच तासानंतर घशात त्रास होत होता. मग रॅपिड टेस्ट केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

हेही वाचा : महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात तब्बल 8 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

फोटिया आपल्या घरी आयसोलेट 

"विमानामध्ये बसल्यानंतर मला त्रास जाणवत होता. मनात अनेक विचार येत होते. मग मी स्वतःला धीर दिला आणि एक शेवटची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मला धक्काच बसला", असे मारिसा फोटियोने सांगितले. रिपोर्टनुसार, मारिसा फोटियोने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तसेच तिने बूस्टर शॉटदेखील घेतलेला आहे. याशिवाय, लोकांशी संपर्क असल्याने दर आठवड्याला ती कोरोना चाचणी करत असते. सध्या फोटिया आपल्या घरी आयसोलेट झाली असून घरीच कोरोनावरील उपचार घेत आहे.

हेही वाचा : 'थांबायचं नाही, पण...', महाराष्ट्र कोरोनाच्या सावटाखाली असताना मुख्यमंत्र्यांचे धीर देणारे बोल

कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. सॅनिटायझरचा नियमित वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि बाहेर पडताना मास्क घालणे, या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ज्या प्रकारे फोटियो यांनी लक्षणे दिसल्यानंतर कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला, अगदी तसेच तुम्हीदेखील कोरोना लक्षाणांकडे दुर्लक्ष करु नका आणि खबरदारी बाळगा.

First published: