मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Vaccine Update: ‘या’ लशीचा एक डोस पुरेसा, रेफ्रिजरेटरमध्ये साठवण्याचा मार्गही मोकळा

Corona Vaccine Update: ‘या’ लशीचा एक डोस पुरेसा, रेफ्रिजरेटरमध्ये साठवण्याचा मार्गही मोकळा

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (FDA) जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) कंपनीच्या लशीला मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या लशीचा एक खुराकही पुरेसा असेल. त्याचबरोबर ही लस फ्रिजरच्या ऐवजी रेफ्रिजरेटरमध्येही ठेवता येणार आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (FDA) जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) कंपनीच्या लशीला मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या लशीचा एक खुराकही पुरेसा असेल. त्याचबरोबर ही लस फ्रिजरच्या ऐवजी रेफ्रिजरेटरमध्येही ठेवता येणार आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (FDA) जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) कंपनीच्या लशीला मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या लशीचा एक खुराकही पुरेसा असेल. त्याचबरोबर ही लस फ्रिजरच्या ऐवजी रेफ्रिजरेटरमध्येही ठेवता येणार आहे.

पुढे वाचा ...
  वॉशिंग्टन, 28 फेब्रुवारी :  कोराना व्हायरस महामारीचा (Coronavirus pandemic)  सर्वात मोठा फटका बसलेल्या अमेरिकेत लसीकरणाचा वेग वाढला आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (FDA) जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson &  Johnson) कंपनीच्या लशीला मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या लशीचा एक खुराकही पुरेसा असेल. त्याचबरोबर ही लस फ्रिजरच्या ऐवजी रेफ्रिजरेटरमध्येही ठेवता येणार आहे. आणिबाणीच्या काळात ही लस वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. लशीचे वैशिष्ट्य काय? बेल्जियमच्या फर्मने बनवलेली ही लस गंभीर आजारी असलेल्या रुग्णांमध्ये 85 टक्के परिणामकारक आढळली आहे. मात्र सामान्य रुग्णांमध्ये ही लस 66 टक्के परिणामकारक आढळली आहे. अमेरिका, लॅटीन अमेरिकेतील देश आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये लशीची चाचणी घेण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचे अधिक घातक स्वरुप समोर आल्यानंतर या सर्व चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या फाइजर आणि मॉडर्ना लशीच्या परिक्षणाच्या वेळीस ही परिस्थिती नव्हती. या लशीचा साठा (Storage) करण्यात फार अडचण येणार नाही. 35.6 ते 46.4 फॅरेनहाईट (Fahrenheit) सेल्सियस तापमानात ही लस ठेवता येणार आहे. फ्रिजर ऐवजी रेफ्रिजरेटरमध्ये ही लस ठेवता येणार असल्यानं याचा अधिक साठा करणे शक्य होणार आहे. US Food and Drug Administration issued an emergency use authorization for a third safe and effective vaccine to help us defeat the COVID-19 pandemic — the Janssen COVID-19 (Johnson & Johnson) vaccine: The White House — ANI (@ANI) February 28, 2021 अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या लशीचे परिक्षण करण्यात आलेल्या एकाही नागरिकाचा यामध्ये मृत्यू झालेला नाही. तसंच 28 दिवसांनंतर एकही रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला नाही. अमेरिकेला 10 कोटी लशीचा पुरवठा करण्याचं या कंपनीनं मान्य केलं असून पहिला डोस पुढच्या आठवड्यातच मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेप्रमाणे युरोपीयन युनियन (EU) आणि कॅनडा यांनी या लशीची ऑर्डर दिली आहे. तसंच एकूण 50 कोटी लशीचा पुरवठा Covax योजनेच्या अंतर्गत गरीब देशांना केला जाणार आहे. बायडेन यांनी केलं स्वागत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या नव्या लशीचं स्वागत केलं आहे. ‘ही अमेरिकेसाठी आनंदाची बातमी आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या नागरिकांनी सतत हात धुवावेत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावेत,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत 4.45 कोटी लोकांना फाइजर किंवा मॉर्डना व्हॅक्सीनचा किमान एक खुराक देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर साधारण दोन कोटी लोकांना दुसरा खुराक देखील मिळाला आहे. (वाचा : अरे देवा! आता न्यूयॉर्कमध्येही कोरोनाचा नवा स्ट्रेन; लशीच्या क्षमतेवरही करू शकतो परिणाम ) कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत सर्वात जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर अमेरिकेत 5 लाख 12 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये या मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी मेणबत्ती लावून शोक व्यक्त करण्यात आला होता. कोरोना व्हायरसमुळे जगभरात मृत्यू पावलेल्या एकूण व्यक्तींपैकी 19 टक्के व्यक्ती एकट्या अमेरिकेत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेत लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीला मान्यता मिळाल्यामुळे हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही लस घेतल्यानंतर बारीक ताप, डोकेदुखी, थकवा ही लक्षणे दिसू शकतात अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Covid19, International, Joe biden, United States of America

  पुढील बातम्या