अमेरिकेचा शहाणपणा; कोरोनावरच्या औषधाचा स्टॉक केला खरेदी; इतर देशांना नाही मिळणार Remdesivir

अमेरिकेचा शहाणपणा; कोरोनावरच्या औषधाचा स्टॉक केला खरेदी; इतर देशांना नाही मिळणार Remdesivir

अमेरिकेने Remdesivir चा सर्व साठा खरेदी केल्यामुळे पुढील तीन महिने इतर देशांना हे औषध उपलब्ध होणार नाही.

  • Share this:

न्यूयॉर्क, 01 जुलै : जगभरात कोरोनाव्हायरसची (coronavirus) संख्या वाढते आहे. अशात काही औषधं कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी ठरत आहेत. अशाच औषधांपैकी एक म्हणजे रेमडेसिवीर (Remdesivir). त्यामुळे अमेरिकेनं (America) आता या औषधाचा संपूर्ण स्टॉक खरेदी केला आहे. ज्यामुळे इतर देशांना पुढील तीन महिने हे औषध मिळणारच नाही.

रेमडेसिवीर हे अँटिव्हायरल औषध आहे. अमेरिकेतल्या गिलियड सायन्स (Gilead Sciences) कंपनीचं हे औषध आहे.  इबोलाशी लढण्याासाठी हे औषध वापरण्यात आलं होते. या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरा होत असल्याचा दावा केला जातो आहे. यूएस नॅशनल हेल्थ इन्स्टिट्युटमार्फत करण्यात आलेल्या अभ्यासात कोरोना रुग्णांवर या औषधाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. त्यानंतर यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने या औषधाचा कोरोना रुग्णांवर आपात्कालीन उपचारासाठी वापर करण्यास मंजुरी दिली.

आता अमेरिकेनं या औषधाचा ग्लोबल स्टॉक खरेदी केला आहे. यूएस डिपार्टमेंड ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेजमार्फत 5 लाखांपेक्षा जास्त औषधांचे डोस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हे वाचा - GOA IS ON : तब्बल 100 दिवसांनंतर गोवा उद्यापासून पर्यटकांसाठी खुलं

अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा सचिव अ‍ॅलेक्स अजार यांनी सांगतिलं, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या नागरिकांसाठी सर्वात आधी करार केला आहे. अमेरिकेतल्या कोणत्याही नागरिकाला रेमडेसिवीरची गरज असेल तर ते त्याला सहजरित्या उपलब्ध व्हावं, हाच आमचा उद्देश आहे. ट्रम्प सरकार कोरोनाविरोधात आवश्यक उपचार आणि अमेरिकन नागरिकांच्या उपचारासाठी सदैव तत्पर आहे"

भारतातही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपत्कालीन वापरासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली आहे.

अमेरिकेत दिवसाला रोज 1 लाख नवीन रुग्ण सापडतील

अमेरिकेत सर्वात जास्त कोरोनाबाधित असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. यातच आता अमेरिकन वैज्ञानिकांनी अमेरिकेत दररोज 1 लाख नवीन रुग्ण सापडण्याची चिंता व्यक्त केली आहे.

हे वाचा - आता काय म्हणावं! गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी महापौरांनीच तोडला लॉकडाऊन

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड इन्फेक्टीव्ह डिसिसीजचे हेड अँथनी फॉसी यांनी असा इशारा दिला आहे की, "अमेरिकेत पुन्हा गोष्टी बिघडत चालल्या आहेत आणि जर लवकरात लवकर पाऊले उचलली गेली नाहीत तर ती परिस्थिती हाताबाहेर जाईल. लोकांना मास्क घालावे लागतील आणि सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करावे लागेल. खबरदारी घेतली गेली नाही तर येत्या काळात अमेरिकेत दररोज एक लाखांहून अधिक केसेस येतील यात शंका नाही"

संपादन - प्रिया लाड

First published: July 1, 2020, 7:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading