Home /News /coronavirus-latest-news /

प्राण्यांमध्ये वाढली कोरोनाची भीती, लायन सफारी पार्कातील दोन सिंहीणी COVID-19 Positive!

प्राण्यांमध्ये वाढली कोरोनाची भीती, लायन सफारी पार्कातील दोन सिंहीणी COVID-19 Positive!

आज संपूर्ण जग कोरोनाशी लढा (Second Wave of Coronavirus) देत आहे. माणूस लॉकडाऊनमध्ये (COVID-19 Locdkown) घरामध्ये बंद असताना प्राणीजगत मात्र मुक्त विहार करताना पाहायला मिळत होतं. मात्र...

    इटावा, 08 मे: आज संपूर्ण जग कोरोनाशी लढा (Second Wave of Coronavirus) देत आहे. माणूस लॉकडाऊनमध्ये (COVID-19 Locdkown) घरामध्ये बंद असताना प्राणीजगत मात्र मुक्त विहार करताना पाहायला मिळत होतं. मात्र आता कोविडचं सावट प्राण्यांपर्यंत देखील जाऊन पोहोचलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचं संकट वाढतं आहे. याठिकाणी इटावामध्ये असणाऱ्या लायन सफारी पार्कातील (Etawah Safari Park) दोन सिंहीणी गौरी आणि जेनिफर कोरोना पॉझिटिव्ह (Two lionesses have tested positive for COVID-19) आढळून आल्या आहेत. सिंहीणींना कोरोनाची लागण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गौरी आणि जेनिफरला सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सफारी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार दोन सिंहीणींची प्रकृती स्थिर आहे. इटावा सफारी पार्कचे संचालक केके सिंह यांनी याची पुष्टी केली की लायन सफारीच्या सिंहीणी गौरी आणि जेनिफर या दोघींना आयबीआरआय बरेली याठिकाणाहून आलेल्या त्यांच्या तपासणी अहवालानुसार कोरोनाची लागण झाली आहे. इटावा सफारीमध्ये असणाऱ्या या दोघींची तब्येत गेले काही दिवस खराब होती. अखिल भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था बरेलनी ही तपासणी केली आहे. सफारीचे  संचालक केके सिंह यांनी यांनी शुक्रवारी संध्याकाळी प्रेसनोट जारी करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 एप्रिलपासूनच गौरी आणि जेनिफरची तब्येत खराब होती, त्या दोघींना ताप होता. त्यानंतर त्यांचे रक्त तपासणीसाठी बरेली याठिकाणी पाठवण्यात आले होते. 6 मे रोजी त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल समोर आल्याने सफारी पार्कमध्ये चिंतेचं वातावरण होतं. दोघी सध्या पशु वैद्यकीय रुग्णालयात आयसोलेशनमध्ये असून तज्ज्ञांकडून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. हे वाचा-कोरोनाच्या भीतीनं विल्समसननं 3 दिवसांपूर्वीच सोडली दिल्ली, बोर्डाला कल्पनाच नाही याआधी हैदराबाद याठिकाणी असणाऱ्या प्राणी संग्रहालयामध्ये 8 सिंह कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. यानंतरच इटावा याठिकाणच्या 14 सिंह-सिंहीणींच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. जेनिफर आणि गौरी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर लायन सफारी पार्कात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याआधी कोरोना काळातच गुजरातमधील जूनागड याठिकाणी 23 सिंहाचा बवेसियोसिस संक्रमणामुळे मृत्यू झाला होता, त्यानंतर देशातील सर्व सफारी, प्राणीसंग्रहालयं सतर्क झाली होती. त्यावेळी देखील इटावामध्ये सॅम्पल टेस्टिंग करण्यात आलं होतं. या प्राण्यांजवळ जाण्याची कुणालाही परवानगी नव्हती. याठिकाणी सॅनिटायझेशनची व्यवस्था देखील वाढवण्यात आली होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या