Home /News /coronavirus-latest-news /

हंगामी होणार कोरोनाचं स्वरुप; आणखी काही वर्ष सामना करावा लागण्याची भीती- UN

हंगामी होणार कोरोनाचं स्वरुप; आणखी काही वर्ष सामना करावा लागण्याची भीती- UN

Corona May Become Seasonal: काही जणांना ऋतु बदलला की जसं सर्दी, खोकला, ताप येतो त्याचप्रमाणं कोरोना आजार (Corona virus) होण्याची शक्यता संयुक्‍त राष्‍ट्रांनी (United Nations) वर्तवली आहे.

नवी दिल्ली, 18 मार्च: काही जणांना ऋतु बदलला की जसं सर्दी, खोकला, ताप येतो त्याचप्रमाणं कोरोना आजार (Coronavirus) होण्याची शक्यता संयुक्‍त राष्‍ट्रांनी (United Nations) वर्तवली आहे. भारतच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्रत्येक देशाकडून प्रयत्न सुरु आहे. कोरोनाच्या भीती दरम्यान संयुक्त राष्ट्रनं सांगितलं की, कोरोना व्हायरस लवकरच ऋतु बदलानुसार होणाऱ्या आजाराचं (seasonal disease) रुप धारण करु शकतो. चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या एका वर्षानंतरही वैज्ञानिकांना या आजाराचं गूढ सोडवता आलं नाही. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत जवळपास 2.7 मिलियन लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसवर अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांच्या एका टीमनं कोरोनाच्या प्रसारावर माहिती मिळवण्यासाठी हवामानशास्त्र आणि हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला आणि त्यांच्या परिणामाबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. या अभ्यासामध्ये वैज्ञानिकांना असं आढळलं की, कोरोना व्हायरस ऋतु बदलामुळे होणाऱ्या हवामान बदलानंतर होणाऱ्या आजाराप्रमाणे होत राहील आणि पुढील काही वर्षांपर्यंत अशाचप्रकारे चिंता वाढवत राहील. (हे वाचा-पुण्यानंतर आता मुंबईतही कोरोना लशीची निर्मिती; इथं तयार होणार Corona vaccine) संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने स्थापन केलेल्या 16 सदस्यांच्या टीमनं असं सांगितलं की, 'श्वसनासंबंधी संक्रमण अनेकदा हवामान बदलाप्रमाणे असतात. कोरोना व्हायरस (Covid-19) देखील हवामान आणि तापमानानुसार आपला प्रभाव दाखवेल.' वैज्ञानिकांच्या टीमनं सांगितलं की, 'कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी आतापर्यंत ज्या पद्धतीनं प्रयत्न केले गेले त्यावर पाणी फिरल्याचं पाहायला मिळत आहे. जर पुढील काही वर्षांपर्यंत हे अशाच पद्धतीनं कायम राहिलं तर कोरोना हा ऋतु बदलानुसार होणारा आजार होऊ शकतो.' WHOचा इशारा-प्रत्येक आठवड्याला वाढत आहेत कोरोनाची 10 टक्के नवी प्रकरणं जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोनाच्या प्रकरणात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रमाण अमेरिका आणि युरोपचं राहिलं आहे. डब्ल्यूएचओने कोरोना व्हायरस या जागतिक महामारीसंबंधी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या प्रकरणांची पातळी शिगेला पोहोचली होती आणि आठवड्याला 50 लाख प्रकरणं समोर येत होती. मात्र फेब्रुवारीच्या मध्यामध्ये कोरोनाच्या प्रकरणात घट झाली आणि हा आकडा 25 लाखांपर्यंत पोहचला होता.
First published:

Tags: Corona, Corona spread, Corona updates, Coronavirus, Covid19, Unseasonal rains

पुढील बातम्या