Home /News /coronavirus-latest-news /

मुलगी COVID Warrior झाल्याचा अभिमान! केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला PHOTO

मुलगी COVID Warrior झाल्याचा अभिमान! केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला PHOTO

केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनी पीपीई किट (PPE Kit) घातलेल्या आपल्या मुलीचा फोटो नुकताच ट्विटरवर शेअर केला आहे. 'माझी मुलगी, माझा अभिमान' असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे

नवी दिल्ली, 27 एप्रिल: आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण होणं, बऱ्याच मेहनतीनंतर तिला यश मिळणं, ही बाब पित्यासाठी अत्यंत सुखावह असते. वडिलांची छाती अशा वेळी गर्वाने फुलून येते. हा प्रसंग नुकताच केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांच्या आयुष्यात घडला आहे. त्यांनी पीपीई किट (PPE Kit) घातलेल्या आपल्या मुलीचा फोटो नुकताच ट्विटरवर शेअर केला आहे. दिशा (Disha) असं तिचं नाव आहे. मनसुख मंडाविया यांनी फोटोसोबत मुलीचा अभिमान आहे, या आशयाचं कॅप्शन देखील लिहिलं आहे. ते म्हणतात, 'माझी मुलगी, माझा अभिमान. दिशा, तुला या भूमिकेत पाहण्यासाठी मी बराच काळ प्रतीक्षा केली आहे. सध्याच्या कठीण काळात इंटर्न (Intern) म्हणून तू कर्तव्य निभावत (Covid Warrior) आहेस, हे पाहून मला तुझा अभिमान वाटतो. देशाला तुझ्या सेवेची गरज आहे आणि मला खात्री आहे, की तू स्वतःला सिद्ध करशील,' असं मनसुख यांनी लिहिलं आहे. 'मोअर पॉवर टू यू माय वॉरियर' असे आशीर्वाद देऊन त्यांनी पोस्टचा शेवट केला आहे. मंडाविया यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर ट्विटरवरील अन्य युझर्सनीही दिशाचं कौतुक केलं. या फोटोला हजारो लाइक्स आणि रिट्वीट मिळत आहे. अनेकांनी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचं कौतुक केलं आहे. आणखीही काही जणांनी आपापल्या कुटुंबातल्या मुली इंटर्न म्हणून, नर्स म्हणून किंवा डॉक्टर म्हणून कशा काम करत आहेत, याचे फोटो त्यावर शेअर केले आहेत. (हे वाचा-जगभरातील 38 टक्के कोरोना रुग्ण भारतात, 'या' बाबतीतही सर्व देशांना टाकलं मागे) कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave in India) आल्यानंतर देशातली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन पाहते आहे. गेल्या काही दिवसांत दररोज तीन लाख नवे रुग्ण आढळत आहेत. तसंच अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. महाराष्ट्रासह काही राज्यातून दिलासादायक बातम्याही समोर येत आहेत, अशा सकारात्मक बदलाची सध्या देशाला गरज आहे. हे घडण्यासाठी कोव्हि़ड वॉरिअर्स मोलाची मदत करत आहे. दरम्यान, ऑक्सिजन (Medical Oxygen) किंवा ऑक्सिजननिर्मितीशी संबंधित उपकरणांची वाहतूक करणाऱ्या सर्व जहाजांचा कर माफ करण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व प्रमुख बंदरांना दिले आहेत. तसंच, सरकारने रेमडेसिवीरच्या (Remdesivir) उत्पादनासाठी 25 नव्या केंद्रांना परवानगी दिली आहे. त्यामुळे देशाची निर्मितीक्षमता दर महिन्याला 40 लाख व्हायल्सवरून 90 लाख व्हायल्सवर पोहोचणार असल्याची माहिती मनसुख मंडाविया यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या