नवी दिल्ली, 06 जुलै : 18+ सर्वांना कोरोनाचा तिसरा म्हणजे प्रिकॉशन डोस दिला जातो आहे (Corona Precaution Dose). तुम्हीही हा डोस घ्यायला जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रिकॉशन डोस घेण्यापूर्वी आधी ही बातमी वाचा. कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या प्रिकॉशन डोसमध्ये काही बदल केले आहेत. प्रिकॉनशन डोसचा कालावधी बदलण्यात आला आहे (Corona Precaution Dose gap).
तज्ज्ञांच्या मते, कोरोना लशीच्या दुसऱ्या डोसनंतर शरीरात तयार झालेली इम्युनिटी काही महिन्यांनंतर कमी होते. त्यामुळे ही इम्युनिटी पुन्हा तयार करण्यासाठी तिसऱ्या डोसची गरज असते. कित्येक देशांमध्ये हा डोस बूस्टर डोस म्हणून दिला जातो. भारतात याला ‘बूस्टर डोस’ न म्हणता ‘प्रिकॉशन डोस’, म्हणजेच खबरदारीचा डोस (Precaution Dose) म्हटलं जात आहे.
हे वाचा - डेंग्यू-चिकुनगुनियाचा नायनाट होणार! प्रयोगशाळेत निर्मित मादी डास नरांना भुलवणार! अशी आहे योजना
भारतात आतापर्यंत दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी हा डोस दिला जात होता. पण आता दुसरा डोस आणि प्रिकॉशन डोसमधील गॅप कमी करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रिकॉशन डोससाठी अंतर आता 9 महिन्यांवरून 6 महिने केलं आहे. म्हणजे कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर आता 9 ऐवजी 6 महिन्यांनी तुम्हाला हा प्रिकॉशन डोस घेता येणार आहे. त्यामुळे तिसऱ्या डोससाठी 9 महिने लांबलचक प्रतीक्षा आता थोडी कमी झाली आहे.
Union Health Ministry reduces gap for COVID-19 precaution doses from existing 9 months to 6 months for those above 18 years pic.twitter.com/s7YmO3SwZh
— ANI (@ANI) July 6, 2022
10 एप्रिल 2022 पासून 18 वर्षांवरील वयोगटासाठी कोविड प्रतिबंधक लशींची खबरदारीची (प्रिकॉशन डोस) लसमात्रा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 18 ते 59 वयोगटातील नागरिकांसाठी खाजगी लसीकरण केंद्रांवर ही लस उपलब्ध आहे. तर 60 पेक्षा जास्त वयाचे नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्ससाठी ही लस सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत दिली जात आहे.
हे वाचा - लेकीचं लग्न ठरवायला आलेल्या व्यक्तीने 40 वर्षीय महिलेला दिलं आपलं हृदय; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी
केंद्र सरकारने 6 जुलैला दिलेल्या माहितीनुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 198.20 (1,98,20,86,763) कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यापैकी 4,75,78,267 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. यात 18 ते 14 वयोगटातील 33,99,371, 45 ते 59 वयोगटातील 27,76,957, 60 पेक्षा जास्त वयाच्या 2,50,63,110 नागरिकांनी तिसरा डोस घेतला. तर 57,75,640 आरोग्य कर्मचारी आणि 1,05,63,189 फ्रंटलाइन वर्कर्सना हा डोस देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus