मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

ती एक चूक! BMC च्या धडकी भरवणाऱ्या XE रिपोर्टबाबत काही तासातच मोदी सरकारकडून सर्वात मोठी अपडेट

ती एक चूक! BMC च्या धडकी भरवणाऱ्या XE रिपोर्टबाबत काही तासातच मोदी सरकारकडून सर्वात मोठी अपडेट

भारतातील XE variant बाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वात महत्त्वाची माहिती दिली आहे.

भारतातील XE variant बाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वात महत्त्वाची माहिती दिली आहे.

भारतातील XE variant बाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वात महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 06 एप्रिल : भारतात XE variant ने शिरकाव केल्याच्या बातमीने सर्वांनाच धडकी भरली (XE variant in India). मुंबईत या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली आणि एकच खळबळ उडाली  (XE variant in Mumbai). यानंतर अवघ्या काही तासांतच मोदी सरकारने याबाबत सर्वात मोठी अपडेट दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने XE रुग्णाबाबत मोठी माहिती दिली आहे.

मुंबईत जीनोम सिक्वेसिंगसाठी काही नमुने पाठवण्यात आले होते. यात शहरात कोरोनाच्या दोन नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचं निदान झालं आहे. यामध्ये XE आणि Kappa variant च्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, असं मुंबई महापालिकेने (BMC) दिली.

मुंबईत आलेल्या दक्षिण आफ्रिकेतील एका 50 वर्षांच्या महिलेमध्ये हा व्हेरिएंट सापडल्याचं बीएमसीने सांगितलं. तिच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नाही आहेत. तिला दुसरा कोणता आजारही नाही.

हे वाचा - Alert! कोरोनापेक्षाही महाभयंकर Zombie Virus पसरतोय; खरंच प्रत्यक्षात माणसं झॉम्बी बनणार?

10 फेब्रुवारीला ही महिला दक्षिण आफ्रिकेहून भारतात आली. जेव्हा ती भारतात आली तेव्हा गाइडलाइन्सनुसार तिची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. पण 2 मार्चला नियमित चाचणीत मात्र तिचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिला हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं.

पण केंद्र सरकारने भारतातील एक्सई व्हेरिएंटचं वृत्त फेटाळलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "ज्या रुग्णाच्या नमुन्याला XE व्हेरिएंट म्हटलं जातं आहे, त्याच्या FastQ फाइलचं विश्लेषण जिनोमिक एक्सपर्ट्सनी केलं आहे. त्यांनी या फाइलचं जीनोम सीक्वेंसिंगम XE व्हेरिएंटच्या जिनोमिक पिक्चरशी जुळत नसल्याचं म्हटलं आहे"

हे वाचा - हातपाय बिलकुल हलवू शकत नव्हता; पण नर्सने असं काही केलं की अंथरूणातच नाचू लागला तरुण रुग्ण

XE हा ओमिक्रॉनचे (Omicron) सबव्हेरिएंट  BA.1 आणि BA.2 या प्रकारातून बनलेला आहे. म्हणजे तो recombinant आहे. 19 जानेवारी रोजी सर्वात आधी यूकेमध्ये हा व्हेरिएंट आढळला. WHO च्या प्राथमिक अंदाजानुसार, XE हा ओमिक्रॉनच्या BA.2  पेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. मात्र, या दाव्याविषयी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे, असंही WHO ने म्हटले आहे.

First published:

Tags: Coronavirus