कोरोना लशीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली महत्त्वाची अपडेट

कोरोना लशीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली महत्त्वाची अपडेट

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, लोकांना घाबरुन जाण्याची गरज नाही. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यात सांगितलं की...

  • Share this:

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : आज शनिवारी ग्रुप ऑफ मिनिस्टर्स यांच्या 22 व्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, भारताचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक 95.46 टक्के आहे. देशात आज कोरोना रुग्णांची संख्या  1 कोटीपर्यंत पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, लोकांना घाबरुन जाण्याची गरज नाही. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यात सांगितलं की, स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे आणि आमच्याकडे 30 कोटी लशीकरणाची क्षमता असेल.  भारतातील मृत्यू दर जगातील सर्वात कमी आहे, जो 1.45 टक्के आहे. संपूर्ण भारतात 16 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यासह त्यांनी सांगितले की, आमची वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ज्ञ ही लस बनवण्याचे काम करत आहेत. या संदर्भात, जीनोम सिक्वेंसींग, कोरोना व्हायरस आयसोलेशन आणि स्वदेशी लस विकसित करण्यात आली आहे. ज्या 6 ते 7 महिन्यांत भारतात 300 दशलक्ष लोकांना लस देण्यास सक्षम असतील.राज्याबद्दल सांगावयाचे झाल्यास येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी 4 हजार 467 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 17 लाख 78 हजार 722 एवढी झालीय. Recovery Rate 94.17वर गेला आहे. तर 3 हजार 994 नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ही 18 लाख 88 हजार 767 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात 75 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.57 एवढा झाला आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र अजुनही धोका टळलेला नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर केल्यास संसर्ग टाळता येऊ शकतो हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेचे नियम पाळण्यात कुचराई न करता नियमांचं पूर्ण पालन करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच नागरिकांना केलं होतं.

Published by: Meenal Gangurde
First published: December 19, 2020, 4:10 PM IST

ताज्या बातम्या