विविध आजारांशी लढा देणाऱ्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचा धोका अधिक, अभ्यासात आले समोर

विविध आजारांशी लढा देणाऱ्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचा धोका अधिक, अभ्यासात आले समोर

एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, अन्य काही व्याधी असणाऱ्यांना कोरोनाची लागण लवकर होत आहे. त्याचप्रमाणे असे आजारपण असणाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : कोरोनाबाबत (Coronavirus) अनेक संशोधन जगभरातील विविध भागात केले जात आहे. यावर लस शोधताना कोरोनाबाबतच्या इतर बाबींमध्ये देखील रिसर्च केला जात आहे. दरम्यान कोव्हिड-19 बाबात काही माहिती या संशोधनातून समोर येते आहे. दरम्यान नुकत्याच एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, अन्य काही व्याधी असणाऱ्यांना कोरोनाची लागण लवकर होत आहे. त्याचप्रमाणे असे आजारपण असणाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे. अन्य व्याधी असलेल्या लोकांचे कोरोनामुले अधिक प्रमाणात मृत्यू होत असल्याचे पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसीनच्या ( Penn State College of Medicine) संशोधकांना आढळले आहे. प्लस वन वेबसाइटवरवर प्रकाशित त्यांच्या अभ्यासानुसार त्यांच्या टीमने वेगवेगळ्या 25 अभ्यासांवर काम केलं तसंच 65 हजार रुग्णांच्या डेटाची तपासणी केली. ज्या रुग्णांना हृदयाचे आजार आहेत, ज्यांना मधुमेह, कॅन्सर, अस्थमा, उच्च रक्तदाब, यकृताचे आजार, किडनी विकार हे आजार आहे त्यांचा कोव्हिडने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे या अभ्यासात समोर आले आहे.

(हे वाचा-कोरोनाची माहिती देणारे व्हिडीओ पाहताय? YouTube ने घेतला महत्त्वाचा निर्णय)

डिसेंबर 2019 ते जुलै 2020 दरम्यान प्रकाशित केलेल्या अभ्यासातून हा डेटा गोळा करण्यात आला आहे. त्यात मेडलाइन, स्कॉपस, ओव्हिड आणि कोचरेन लायब्ररी डेटाबेस आणि मेड्रॅक्सिव्ह ऑर्ग. याठिकाणच्या डेटाचा समावेश आहे. यात असं आढळलं की गंभीर आजार असलेल्या रुग्णांना कोरोना मृत्यूचा धोका जास्त असतो.

या संशोधनातील महत्त्वाचे मुद्दे-

1. किडनी विकार असलेल्या लोकांमध्ये कोरोनाने मृत्यू होण्याचे हे प्रमाण तिप्पट आहे.

2. हृदयविकार, उच्च रक्तदाब असलेल्यांमध्ये मृत्युचं प्रमाण दुप्पट आहे.

3. मधुमेह आणि कॅन्सर रुग्णांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका 1. 5 पट अधिक आहे.

(हे वाचा-कोरोना महामारीत खोट्या माहितीचा महापूर; सावधान ! असे पसरतात गैरसमज)

अशा परिस्थितीत जनजागृती निर्माण होण्यासाठी हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेसारख्या ठिकाणी  उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन आणि मधुमेह यासारख्या आजारांचे लोकांमध्ये निदान झाले नाही म्हणून त्या व्यक्तीला माहिती नसते, अशात त्यांच्यात मृत्यूचा धोका अधिक संभवतो. असेच आजार असल्याची माहिती नसल्यामुळे काळजी घेतली नाही आणि कोव्हिडमुळे मृत्यू झाल्याची प्रकरणं तिथे अधिक सापडली आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना विलगीकरणात ठेवून त्यांना सुरक्षित ठेवणं ही मोठी गरज आहे. प्रशासनाने अशा रुग्णांवर अधिक लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 16, 2020, 12:20 AM IST

ताज्या बातम्या