Home /News /coronavirus-latest-news /

शाळा सुरू नाही तर बंद असल्यामुळे वाढणार मृतांची संख्या! तज्ज्ञांनी शोधला कोरोनाचा नवा पॅटर्न

शाळा सुरू नाही तर बंद असल्यामुळे वाढणार मृतांची संख्या! तज्ज्ञांनी शोधला कोरोनाचा नवा पॅटर्न

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील सर्वच देशांनी शाळा बंद ठेवल्या होत्या, मात्र आता खुल्या ठेवण्याऐवजी शाळा बंद राहिल्यामुळे कोरोनाचा प्रसार आणि रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

    लंडन, 09 ऑक्टोबर : कोरोनाव्हायरसमुळे (Covid-19 Pandemic) शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील सर्वच देशांनी शाळा बंद ठेवल्या होत्या, मात्र आता खुल्या ठेवण्याऐवजी शाळा बंद राहिल्यामुळे कोरोनाचा प्रसार आणि रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा मृत्यू रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग प्रभावी असल्याचेही समोर आले आहे. इतर वयोगटात ते कमी प्रभावी मानले गेले. एडिनबर्ग विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फिजिक्स अॅण्ड अॅस्ट्रोनॉमीचे प्राध्यापक आणि लेखक, ग्रॅमी ऑकलँड यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या मते, “काही काळासाठी शाळा बंद ठेवल्यामुळे कोरोना संक्रमणामुळे होणाऱ्या मृतांची संख्या कमी झाली आहे, मात्र या निर्णयामुळे संक्रमणाच्या नंतरचे टप्पे अधिक धोकादायक झाले आहेत". वाचा-कोरोना काळात आई-बाबा झाल्यास या देशाचे सरकार देणार बोनस, आर्थिक मदतीची घोषणा या वयोगटाकडे अधिक लक्ष देण्याची गरज होती, ग्रॅमी म्हणाले की, 'कोरोनाचा परिणाम कमी करण्यासाठी, वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवेगळ्या रणनीतींची आवश्यकता होती, ज्यात वृद्ध आणि आजारी असलेल्या लोकांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. वाचा-पुरुषांच्या तुलनेत कोरोनाचे नियम पाळण्यात महिलाच आघाडीवर, संशोधकांचा दावा रिपोर्ट 9च्या विश्लेषणावर आधारित या अभ्यासाचा निकाल 'रिपोर्ट 9' च्या विश्लेषणावर आधारित आहेत. लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या या अभ्यासाचा उपयोग वैज्ञानिक सल्लागार गटाने 23 मार्च रोजी ब्रिटिश सरकारच्या आपत्कालीन परिस्थितीवर केला. त्याअंतर्गत शाळाही बंद ठेवण्यात आल्या. नवीन विश्लेषण ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले आहे. तज्ज्ञांनी म्हटले आहे की जर शाळा आणि दुकाने पुन्हा बंद केली गेली तर हा आजार बराच काळ टिकू शकेल. तसेच, लसीकरणाचे प्रभावी कार्यक्रम लागू न केल्यास दीर्घकाळात अधिक मृत्यू होतील. वाचा-कोरोना काळात हेल्दी राहण्यासाठी काय आणि किती खावं? फॉलो करा हा Diet भारतात 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार शाळा देशात सुरू असलेल्या Unlockच्या प्रक्रियेनुसार देशात शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली होती. आता 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत. यासाठी मार्गदर्शक सुचनाही जारी करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी तो निर्णय हा सक्तीचा नाही. राज्ये आपल्या राज्यात असलेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर पालकांची लेखी परवानगी घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल. मुलांना शाळेत येणं हे बंधनकारक नाही. मुलं घरी राहून Online माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात असंही या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेलं आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या