लंडन, 24 जानेवारी: ज्या प्रवाशांनी (Travellers) लसीचे दोन्ही डोस (2 dose of vaccines) घेतले आहेत, अशा नागरिकांना युकेत प्रवेश (Entry rules in UK) करण्यासाठी बंधनकारक असणारी कोरोना टेस्ट (Covid Test) रद्द (Scrap) करण्याचा निर्णय युके प्रशासनानं घेतला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी तसे आदेश दिले असून प्रवाशांसाठी आपले दरवाजे पुन्हा खुले करण्याचा इरादा युकेनं व्यक्त केला आहे. ओमिक्रॉनच्या डेटामध्ये सुधारणा होत असून रुग्णसंख्याही कमी होत असल्याचं पाहता अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ब्रिटीशांनी हे पाऊल टाकल्याचं मानलं जात आहे.
काय आहे निर्णय?
युकेमध्ये प्रवेश करण्यासाठी कुठल्याही देशातली प्रवाशांना दोन वेळा RTPCR टेस्ट करणं बंधनकारक आहे. विमान प्रवास सुरु करण्यापूर्वी 48 तासांत कोरोनाची RTPCR टेस्ट करणं बंधनकारक आहेच, त्याशिवाय युकेमध्ये दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा RTPCR टेस्ट केली जाते. त्यामुळे प्रत्येकाला दोन वेळा या टेस्टला सामोरं जावं लागतं. मात्र आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे हे नियम बदलण्याचा निर्णय पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घेतला आहे.
पहिली टेस्ट रद्द
ज्या प्रवाशांनी मान्यताप्राप्त लसींचे दोन डोस घेतले असतील, अशा प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वीची RTPCR टेस्ट करण्याचं बंधन काढून टाकण्यात आलं आहे. थेट लसीकरण सर्टिफिकेट दाखवून प्रवासी युकेमध्ये प्रवेश करू शकतील आणि त्यानंतर दोन दिवसांनी त्यांची RTPCR टेस्ट घेतली जाईल. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच त्यांना देशात प्रवेश दिला जाणार आहे. देशात प्रवेश केल्यानंतर दोन दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकारक असणार असून त्यानंतर टेस्ट निगेटिव्ह येणं गरजेचं असणार आहे.
हे वाचा-Abu Dhabi वर पुन्हा मिसाईल हल्ला, UAE नं जारी केला खतरनाक VIDEO
पर्यटन क्षेत्राला दिलासा
कोरोना काळात सर्वाधिक फटका बसला तो पर्यटन क्षेत्राला. युकेनं सध्या घेतलेला निर्णय मात्र पर्यटन क्षेत्रासाठी चांगला असल्यामुळे या क्षेत्रातील अनेकांंनी याचं स्वागत करत युके सरकारचे आभार मानले आहेत. जगभरातील पर्यटकांना आता युकेचे दरवाजे खुले झाले आहेत. दरम्यान, भविष्यात हे निकष बदलले जाऊ शकतात आणि बुस्टर डोस घेतलेला असण्याचा निकषही लावण्यात येऊ शकतो, असा इशारा युकेनं दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.