लंडन, 25 जानेवारी : आपल्याला कोरोना होऊ नये, यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. तरी कोरोना झाल्याचं निदान झालं तर पायाखालची जमीनच सरकते. एकदा कोरोना झाला की किमान आता तरी आपण सुटलो, असंही अनेकांना वाटतं. पण एका तरुणीला मात्र एकदा नव्हे दोनदा नव्हे तर चार वेळा कोरोनाने गाठलं. धक्कादायक म्हणजे एकाच वर्षात तिला चार वेळा कोरोना झाला. (Girl Gets Covid 4th Time)
chinapress.com च्या रिपोर्टनुसार यूकेमध्ये राहणारी व्हार्टन (Wharton). सप्टेंबर 2020 मध्ये तिला कोरोना झाला होता. त्यावेळी ती नोकरी करत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी फेस मास्क असायचा तरी कोरोनाने तिला आपल्या विळख्यात घेतलं. तिला सर्दी झाली होती. नाकातून पाणी वाहत होतं. त्यावेळी तिला होम क्वारंटाइन करण्यात आलं आणि काही दिवसांनी तिने कोरोनावर मात केली.
त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये तिचे पालक कोव्हिड पॉझिटिव्ह झाले. दोघंही वेगवेगळ्या रूममध्ये होते. तेव्हा व्हार्टनचीही कोरोना चाचणी करण्यात आली, ती पुन्हा पॉझिटिव्ह आढलली. यावेळी तिला ताप नव्हता पण तिचं नाक वाहत होतं. यावेळीही तिने कोरोनाविरोधातील लढा जिंकला. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊन एक महिनाही झाला नाही ती तिसऱ्यांदा कोरोनाच्या विळख्यात आली. अमेरिकेला जात असताना तिची टेस्ट करण्यात आली तेव्हा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. यावेळी तिला साधा सर्दी-खोकला होता.
हे वाचा - मुंबईला इतक्या वेगाने विळख्यात घेतोय Omicron; झोप उडवणारी आकडेवारी
तीन वेळा कोरोना होऊन गेल्यानंतर व्हार्टनने कोरोना लस घेतली. लशीचे दोन्ही डोस घेतले. आता ती आपल्या बुस्टर डोसची प्रतीक्षा करत होती तर तिला पुन्हा म्हणजे चौथ्यांदा कोरोना झाल्याचं निदान झालं. यावेळीही तिला होम क्वारंटाईन करण्यात आलं. पण यावेळी तिच्यामध्ये कोणतीच लक्षणं नाहीत.
पण एका वर्षातच चार वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने लोकही हैराण झाले आहेत. व्हार्टन म्हणाली, कदाचित यावेळी व्हायरस कमजोर झाला असावा. तिच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona patient, Coronavirus