मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

तब्बल 505 दिवस कोरोनाशी झुंज दिली पण शरीरात...; सर्वाधिक कालावधी व्हायरशी लढणाऱ्या रुग्णाच्या मृत्यूनंतर मोठा खुलासा

तब्बल 505 दिवस कोरोनाशी झुंज दिली पण शरीरात...; सर्वाधिक कालावधी व्हायरशी लढणाऱ्या रुग्णाच्या मृत्यूनंतर मोठा खुलासा

Covid patient infected with coronavirus for 505 days : एका व्यक्तीने तब्बल 505 दिवस म्हणजे दीड वर्षे कोरोनाशी झुंज दिली. पण अखेर कोरोनाविरोधातील लढा तो हरला. त्याने अखेरचा श्वास घेतला.  त्या रुग्णाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Priya Lad

लंडन, 22 एप्रिल : कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर त्यातून बरं होण्याचा कालावधी प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. कुणी 15 दिवसात, कुणी महिनाभरात बरं होतं आहेत. पण एका व्यक्तीने तब्बल 505 दिवस म्हणजे दीड वर्षे कोरोनाशी झुंज दिली. पण अखेर कोरोनाविरोधातील लढा तो हरला. त्याने अखेरचा श्वास घेतला.  त्या रुग्णाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे (Covid patient infected with coronavirus for 505 days).

गायज अँड सेंट थॉमसच्या एनएचएस फाउंडेशन ट्रस्टमधील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ  डॉ. ल्यूक ब्लॅगडन स्नेल आणि त्यांच्या टीमने कोरोनाशी सर्वाधिक कालावधी झुंज देणाऱ्या अशा काही लोकांचा स्नेल यांच्या टीमने अभ्यास केला. यात आठ आठवड्यांपर्यंत संक्रमित असलेल्या 9 रुग्णांचा समावेश होता.

हे वाचा - पालकांनो Alert! 5 वर्षांच्या चिमुकलीचा कोरोनाने घेतला बळी; नव्या लाटेचा धोका वाढला?

एपीच्या रिपोर्टनुसार डॉ. स्नेल म्हणाले, "मृत झालेला हा रुग्णा सर्वाधिक कालावधी कोरोनाग्रस्त असलेला रुग्ण आहे, असं स्पष्टपणे सांगू शकत नाही. कारण सर्व कोरोना संक्रमितांची या रुग्णाप्रमाणे नियमित तपासणी करण्यात आली नाही. पण तरी 505 दिवस पाहता  हा नक्कीच सर्वाधिक कालावधी कोरोनाग्रस्त असलेला रुग्ण असावा."

2020 मध्ये या व्यक्तीला कोरोना संक्रमण झालं होतं. त्याच्यावर रेमडेसिवीर औषधाने उपचार करण्यात आले. 2021 मध्ये त्याचा मृत्यू झाला.  मृत्यूचं कारण काय आहे हे सांगण्यास नकार देण्यात आला आहे. या रुग्णाला इतर आजार होते.

या रुग्णासह इतर 9 रुग्णांची रोगप्रतिकारक प्रणाली ही अवयव प्रत्यारोपण, एचआयव्ही, कॅन्सर आणि इतर आजारांच्या उपचारामुळे कमजोर झाली होती. कोणताच रुग्ण रा होऊन पुन्हा कोरोनाचा शिकार झालेला नाही. कर त्याच्या शरीरातच व्हायरस म्युटेट झाले. या म्युटेशनमुळे खतरनाक नाही पण ते नंतर सर्वाधिक पसरणारे व्हेरिएंट्स म्हणून समोर आले.

हे वाचा - Omicron XE Variant Symptoms: Omicron XE व्हेरिएंटमुळे भारतावर Corona च्या चौथ्या लाटेचं सावट?, लहान मुलांना सर्वाधिक धोका

9 पैकी 5 रुग्ण वाचले आहेत. दोन उपचाराशिवाय बरे झाले आहेत. दोघांनी संसर्गावर मात केली. तर एक अद्यापही संक्रमित आहे.

First published:

Tags: Coronavirus