अनिल पाटील, पणजी 20 ऑक्टोबर: गोव्यात कोरोना रुग्णाची संख्या कमी होत असताना मंगळवारी एका दोन महिन्याच्या मुलाचा मृत्यू कोरोनाने झाला आहे आत्तापर्यंतच्या मृत्यू पावलेल्यांमध्ये हा सर्वात कमी वयाचा मृत्यू आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज राज्यात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे गोव्यातील कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचा आकडा 555 वर गेला आहे. उपचारांची शर्थ करूनही वाचलं नाही लेकरू वाचू शकलं नाही त्यामुळे सगळ्या कुटुंबीयांनाच धक्का बसला आहे.
यात सर्वाधिक मृत्यू हे 65 वयापेक्षा जास्त वयाचे आणि अन्य रोगाने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांचे झाले आहेत. गोव्यात आतापर्यंत 40 हजार 800 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 91 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. अलिकडच्या चार दिवसांमध्ये कोरोना लागण होण्याचा प्रमाणही झपाट्याने कमी होत आहे.
या बाळाला कोरोनाची काही लक्षणं दिसल्यानंतर त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र वयामुळे उपचारासाठीही मर्यादा पडत असल्याने ते बाळ कोरोनामुक्त होऊ शकले नाही. डॉक्टरांनी बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र अखेर मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरीकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सणासुदीच्या या दिवसांमध्ये बाजारातसुद्धा अनेक दिवसांनी उत्साह दिसत आहे. पण विसरू नका, लॉकडाऊन संपला असला तरी व्हायरस गेलेला नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi speech) देशवासीयांना सावध केलं.
COVID-19: घसरण कायम, 8 हजार नवे रुग्ण तर 213 जणांचा मृत्यू
प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नामुळे कित्येक महिन्यानंतर भारतात साथ आटोक्यात येत आहे. ही परिस्थिती बिघडू द्यायची नाही. मृत्यूदर कमी आहे, बरं होण्याचं प्रमाण जास्त आहे. साडेपाच हजार लोकांना Coronavirus ची लागण झाली आहे. हे प्रमाण इतर देशांच्या मानाने कमी आहे. पण ही वेळ सावध राहायची आहे, असं पंतप्रधान म्हणाले.