10 दिवसात दोघा सख्ख्या भावांचा कोरोनानं घेतला घास; वयोवृद्ध आई-वडिलांवर कोसळलं आभाळ, गावात हळहळ

10 दिवसात दोघा सख्ख्या भावांचा कोरोनानं घेतला घास; वयोवृद्ध आई-वडिलांवर कोसळलं आभाळ, गावात हळहळ

अवघ्या दहा दिवसांत कोरोनामुळं एकाच कुटुंबातील दोघांचा दुर्दैवी अंत (Corona patients death) झाला आहे. वृद्धापकाळात आधाराची काठी असणाऱ्या या लेकरांचा मृत्यू झाल्यानं मलठणमधील गायकवाड दाम्पत्यावर आभाळ कोसळलं आहे.

  • Share this:

शिक्रापूर, 04 मे: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण येथील एका कुटुंबीयासाठी कोरोना विषाणू (Corona virus) हा काळ ठरला आहे. अवघ्या दहा दिवसांत येथील एक कुटुंबाला कोरोनानं पूर्णपणे उद्धवस्त केलं आहे.  कोरोनामुळं एकाच कुटुंबातील दोघांचा दुर्दैवी अंत (Corona patients death) झाला आहे. त्यामुळे वृद्धापकाळात आधाराची काठी असणाऱ्या या लेकरांचा मृत्यू झाल्यानं मलठणमधील गायकवाड दाम्पत्यावर आभाळ कोसळलं आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित मृत भावंडांची नावं विशाल कृष्णकांत गायकवाड आणि तुषार कृष्णकांत गायकवाड अशी आहेत. 22 एप्रिल रोजी विशालचा कोरोनामुळं मृत्यू झाला. त्याचे सर्व अंत्यविधी लहान भाऊ तुषारने पार पाडले. दरम्यान लहान भाऊ तुषारलाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार घेत असताना त्याची ऑक्सिजन पातळी खालावली त्यामुळे त्याचा उपचारादरम्यान 3 मे रोजी मृत्यू झाला. पहिल्या मुलाच्या मृत्यूचा शोकही संपला नव्हता, तोपर्यंत दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाल्यानं संबंधित गायकवाड दाम्पत्यावर आभाळ कोसळलं आहे.

मलठण येथील रहिवासी असणारे कृष्णाकांत गायकवाड यांचं वय 62 वर्ष असून त्यांच्या पत्नी मंगल कृष्णाकांत गायकवाड या 56 वर्षांच्या आहेत. त्यांना विशाल, सागर, प्रियांका आणि तुषार अशी एकूण चार मुलं आहेत. हातावर पोट भरणाऱ्या या दाम्पत्यानं आयुष्यात अनेक संकाटांचा सामना करत आपल्या लेकरांना पायावर उभं केलं होतं. मात्र, कोरोना विषाणू त्यांच्यासाठी काळ ठरला आहे. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या डोळ्यादेखत जीव सोडला आहे. कोरोनामुळे दुहेरी आघात झाल्यानं संबंधित दाम्पत्य पार कोलमडून गेलं आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा-कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांचं काय? मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांचा मोठा हात

विशालचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुषारलाही कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं. उपचारादरम्यान त्याची ऑक्सिजन पातळी खालावली, अशा स्थितीतही त्यानं दहा दिवस मृत्यूशी एकाकी झुंज दिली. शेवटी त्याला कोरोनापुढं हार पत्करावी लागली. 3 मे रोजी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Published by: News18 Desk
First published: May 4, 2021, 9:34 AM IST

ताज्या बातम्या