Home /News /coronavirus-latest-news /

COVID-19 च्या लशीबद्दल काहीही पोस्ट करताना सावधान! Twitter करणार कारवाई

COVID-19 च्या लशीबद्दल काहीही पोस्ट करताना सावधान! Twitter करणार कारवाई

जग व्यापून टाकलेल्या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आता कोरोनाप्रतिबंधक लसीची (Vaccine) आतुरतेने वाट पाहिली जात आहे. ब्रिटनने गेल्या आठवड्यात फायझर-बायोएनटेकच्या लसीच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात केली.

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या (Corona Pandemic) काळात सोशल मीडियावर अनेक खोटे मेसेजेस (Fake Messages) व्हायरल होत आहेत. अशा मेसेजेसमध्ये खोटे दावे करून कोविड-19च्या (Covid19) लसीबद्दल लोकांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. तसंच, या मेसेजेसमधून लोकांना कोरोना विषाणूबाबतची चुकीची माहिती दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर, ट्विटर (Twitter) या मायक्रोब्लॉगिंग साइटने कोविड लसीशी संबंधित असलेले असे खोटे मेसेज काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या आठवड्यापासून याबाबतची कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती ट्विटरकडून देण्यात आली. कोरोना लसीकरण या देशांमध्ये सुरू झालं... जग व्यापून टाकलेल्या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आता कोरोनाप्रतिबंधक लसीची (Vaccine) आतुरतेने वाट पाहिली जात आहे. ब्रिटनने गेल्या आठवड्यात फायझर-बायोएनटेकच्या लसीच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात केली. अमेरिकेच्या सरकारनेही कोविड19 प्रतिबंधक लशीला आपत्कालीन परिस्थिती म्हणून वापराची परवानगी दिली असून, तिथे लसीकरण मोहीम सुरूही झाली आहे. भारतातही या लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. म्हणूनच ट्विटरने लसीकरणासंदर्भात केल्या जाणाऱ्या खोट्या दाव्यांचा (Fake News) समावेश असलेल्या किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्या मेसेजेसना हटवण्याचा (Delete) निर्णय घेतला आहे. या पोस्ट्स हटवल्या जातील कोरोना विषाणू अस्तित्वात नाही किंवा त्यामुळे होणारी लागण खरी नाही, असा दावा करणाऱ्या पोस्ट्स ट्विटरवरवरून हटवल्या जातील, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. तसंच लसीच्या उपयुक्ततेवर शंका घेणाऱ्या आणि लसीकरणाच्या माध्यमातून नागरिकांना नुकसान पोहोचवण्याचा हेतू असल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट्सही ट्विटरवरून हटवल्या जातील. लग्नाचं वचन देऊन SEX करणं म्हणजे बलात्कारच असं नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय 23 डिसेंबरपासून धोरण लागू येत्या 23 डिसेंबरपासून ट्विटर हे नवं धोरण (New Policy) लागू करणार आहे, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, जे युझर्स या नव्या नियमांचं उल्लंघन करून ट्विट करतील, त्यांची ट्विट्स डिलीट केली जातील, असंही ट्विटरने म्हटलं आहे. लसीकरणासंदर्भात चुकीची माहिती पसरवणाऱ्या पोस्ट्स काढून टाकण्याचा निर्णय फेसबुक (Facebook), तसंच यू-ट्यूब (YouTube) या सोशल मीडिया व्यासपीठांनी याआधीच घेतला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी योग्य मास्क कोणता? संशोधनात समोर आली माहिती अमेरिकेतलं उदाहरण अमेरिकेतल्या टेक्सासच्या रहिवासी असलेल्या पॅट्रिशिया शँडलर (Patricia Chandler) यांना फेक न्यूजचा अत्यंत वाईट अनुभव आला आहे. आपल्या पायावर उठलेल्या डागांचे (Skin Blisters) फोटो चँडलर यांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते. त्या डागांमागचं कारण अजून कळलेलं नाही; मात्र त्या महिलेनं फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) या कंपन्यांच्या कोविड-19 लशीच्या चाचणीमध्ये (Trials) भाग घेतला होता, हे लोकांच्या लक्षात आलं. त्यामुळे पॅट्रिशिया यांनी फोटो शेअर केल्यानंतर लशीविरोधातलं वातावरण तयार होण्यास आणि त्याबद्दल राग व्यक्त करण्यास सुरुवात झाली. अनेकांनी लसीचा आणि त्या डागांचा संबंध जोडला; मात्र वस्तुस्थिती वेगळी होती. त्या महिलेला चाचणीदरम्यान प्लासिबो लस (मिठाचं पाणी असलेली) देण्यात आली होती. चाचणीवेळी काही जणांना खऱ्या लशीऐवजी अशी लस द्यावी लागते. त्यामुळे लसीचा आणि त्या डागांचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं; मात्र तोपर्यंत सोशल मीडियावरून लोकांनी रान माजवलं होतं. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विविध सोशल मीडिया व्यासपीठांनी 'फेक न्यूज'विरोधात बडगा उगारला आहे.
First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india, Twitter

पुढील बातम्या