सोबतच जन्मले अन् जगाचा निरोपही सोबतच घेतला, कोरोनानं 24 वर्षीय जुळ्या भावांचा मृत्यू

सोबतच जन्मले अन् जगाचा निरोपही सोबतच घेतला, कोरोनानं 24 वर्षीय जुळ्या भावांचा मृत्यू

दोन जुळ्या भावांचा कोरोनानं (Coronavirus) बळी घेतला आहे. काही तासाच्या अंतरानंच या 24 वर्षीय या जुळ्या भावांचं निधन झालं.

  • Share this:

मेरठ 18 मे: कोरोना महामारीनं (Coronavirus) अनेक कुटुंब अक्षरशः उद्धवस्त केली आहेत. मात्र, आता समोर आलेल्या एका कुटुंबाची कहाणी अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेमध्ये दोन जुळ्या भावांचा कोरोनानं बळी घेतला आहे. जोफ्रेड वर्गीस ग्रेगोरी (Joefred Varghese Gregory) आणि रालफ्रेड जॉर्ज ग्रेगोरी (Ralfred George Gregory) अशी या दोघांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही 24 वर्षीय इंजिनिअर असलेल्या भावांच्या मृत्यूमध्ये केवळ काही तासांचंच अंतर आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये (Meerut) राहाणाऱ्या राफेल कुटुंबातील आहे.

हे दोन्ही भाऊ जन्मालाही सोबतच आले आणि जगाचा निरोपही त्यांनी सोबतच घेतला. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, जोफ्रेड आणि रालफ्रेडचा मागील आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झाला. दोघांचा जन्म 23 एप्रिल 1997 ला झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 एप्रिलला त्यांना कोरोनाची लागण झाली. दोघंही हैदराबादमध्ये नोकरी करत होते.

दोघांचेही वडील ग्रेगोरी रेमंड राफेल यांनी सांगितलं, की त्यांना या गोष्टीची आधीच कल्पना होती, की त्यांची मुलं बरी झाली तर दोघंही होतील नाहीतर कोणीच नाही. त्यांनी सांगितलं, की या दोघांच्यात एकाला काही झालं तर दुसऱ्यालाही व्हायचं. जोफ्रेडच्या निधनाची बातमी ऐकताच मी पत्नीला सांगितलं, की रालफ्रेडही घरी एकटा परतणार नाही. 13 आणि 14 चौदा मे रोजी काही तासांच्या अंतरानं दोघांचा मृत्यू झाला. राफेल यांना तिन मुलं आहेत. सगळ्यात लहान मुलाचं नाव नेलफ्रेड आहे.

या कुटुंबानं दोघांवरही सुरुवातीला घरीच उपचार केले. त्यांना वाटलं, की हे दोघंही बरे होतील. मात्र, त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माध्यमांसोबत बातचीत करताना ग्रेगोरी यांनी सांगितलं, की रालफ्रेडनं आपल्या आईला शेवटचा कॉल केला होता. त्यानं आईला सांगितलं, की माझी प्रकृती सुधारत आहे आणि जोफ्रेडच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. मात्र, तोपर्यंत जोफ्रेडचं निधन झालं होतं. यानंतर त्याला खोटं सांगण्यात आलं, की त्याला दिल्लीला शिफ्ट केलं आहे. मात्र, रालफ्रेडला कदाचित भनक लागली होती. त्यामुळे, त्यानं आपल्याला आईला विचारलं की तू खोटं का बोलतीये आणि काही तासाच त्याचा मृत्यू झाला.

Published by: Kiran Pharate
First published: May 18, 2021, 12:10 PM IST

ताज्या बातम्या