• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • 'गोव्यात पर्यटन खुलं, कोविड निगेटिव्ह रिपोर्टचीही गरज नाही...', मात्र ही एक अट करावी लागेल पूर्ण

'गोव्यात पर्यटन खुलं, कोविड निगेटिव्ह रिपोर्टचीही गरज नाही...', मात्र ही एक अट करावी लागेल पूर्ण

ही एक अट पूर्ण केली तर तुम्ही जीवाचं गोवा करू शकाल.

 • Share this:
  पणजी, 28 जून: गोवा (Goa) हे असं ठिकाण आहे जेथे केवळ देशातूनच नाही परदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. गोव्यातील समुद्र, तेथील संस्कृती, मासे सर्वच अनोख असं आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून लोकांना कोरोनामुळे घरात बसावं लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचं निमित्त साधून लोक घराबाहेर पडत होते. आता नव्या निर्बंधांमुळे नागरिकांना सायंकाळी 5 नंतर घरात राहणे अनिवार्य असेल. दरम्यान मूड फ्रेश करण्यासाठी गोवा हा पर्याय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे आता गोव्यात (Tourism in Goa) जाण्यासाठी नागरिकांना कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आणणं अनिवार्य नसेल. तर ज्या नागरिकांनी कोरोनाच्या दोन्ही लशी घेतल्या आहेत, ते गोव्यात पर्यटनासाठी येऊ शकतात. राज्य सचिवालयात पत्रकारांशी बातचीत करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत  (Goa CM Doctor Pramod Sawant) यांनी सांगितलं की, गोव्यात संक्रमण दर 6 टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लशींच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, व त्यांच्याकडे याचं प्रमाणपत्र असेल तर त्यांना गोव्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. ही अट पूर्ण केली असेल तर ते पर्यटनासाठी आलेले असो वा व्यवसायाच्यादृष्टीने, त्यांना अडविण्यात येणार नाही. हे ही वाचा-डेल्टा+ व्हेरिअंट देशासाठी किती घातक? CSIRच्या शास्त्रज्ञांचा दिलासादायक अहवाल पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यातील मोठ्या रेल्वे स्टेशनवर कोरोना टेस्टिंगची सुविधा वाढवण्यासाठी खासगी लॅबसोबत चर्चा सुरू आहे. शेजारील राज्यांमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिंएट समोर आल्यानंतर सीमा भागांवर अधिक कडक लक्ष दिलं जात आहे. गोव्यात अद्याप एकही डेल्टा प्लस व्हेरिंएटचा रुग्ण आढळला नाही. कोविड 19च्या डेल्टा (Delta variant of Coronavirus) आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे (Delta Plus Variant of Coronavirus) महाराष्ट्रात नव्याने निर्बंध आणि मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. आजपासून पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू झाले आहेत. संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने प्रतिबंधात्मक सूचना आणि नियम जाहीर केले आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published: