Home /News /coronavirus-latest-news /

जगाला करावा लागणार कोरोनाच्या अनेक लाटांचा सामना? विशेषतज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

जगाला करावा लागणार कोरोनाच्या अनेक लाटांचा सामना? विशेषतज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

भारतात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची प्रकरणे (Omicron Cases in India) वाढत आहेत आणि भारत एका नवीन संभाव्य लाटेच्या (Third Wave of Coronavirus) उंबरठ्यावर आहे.

    नवी दिल्ली 01 जानेवारी : भारतातील अव्वल विषाणूशास्त्रज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी शुक्रवारी सांगितलं की, कोरोना महामारीच्या आणखी अनेक लाटा (Coronavirus Waves) येतील. कारण हा एक श्वासोच्छवासातून पसरणारा विषाणू आहे. असे विषाणू बराच काळ हवामानात कायम राहतात. "आपण SARS-COv-2 विषाणूबरोबर जगणं शिकलं पाहिजे" असंही ते म्हणाले. Omaicron च्या 156 पैकी फक्त 9 जण हॉस्पिटलमध्ये, लस घेणाऱ्याचा नवा रिपोर्ट! टॉप विषाणूतज्ञांची ही प्रतिक्रिया अशावेळी आली आहे, जेव्हा भारतात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची प्रकरणे (Omicron Cases in India) वाढत आहेत आणि भारत एका नवीन संभाव्य लाटेच्या (Third Wave of Coronavirus) उंबरठ्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून, दररोज कोविड प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तर ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. 3 जानेवारीपासून भारत 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण करणार आहे. फ्रंटलाइन कामगार आणि कॉमरेडिडिटी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस दिला जाईल. डॉ. कांग म्हणाले, "मला असं वाटतं की आपण मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे, कारण सर्वसाधारणपणे मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण फारसं गंभीर नसतं. भारतात बूस्टर डोस म्हणून कोणती लस वापरली जावी, याबद्दल खूप कमी डेटा उपलब्ध आहे. विशेष आणि महत्त्वाची बाब म्हणजे आपण दोन वर्षांपूर्वी कोरोनाबाबत जशा स्थितीत होतो, त्याच स्थितीत आज नाही आहोत. आता आपल्याकडे बरीच उपकरणे उपलब्ध आहेत, चाचणी कशी वापरायची, कोणत्या प्रकारचे उपचार कार्य करतात आणि लस कशी वापरायची तसंच बनवायची याची चांगली समज आली आहे, असंही ते म्हणाले. विमान प्रवासादरम्यान महिलेला कोरोनाचे निदान, 5 तास बाथरुममध्ये केलं आयसोलेट पुढे ते म्हणाले, ओमायक्रॉनचा प्रभाव कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा काहीसा कमी गंभीर असल्याचं दिसून येतं. मला वाटतं तिसर्‍या आणि इतर लाटांबाबत लक्षात ठेवण्‍याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरी किंवा चौथी किंवा पाचवी लाटदेखील येईल. कोरोना हा असा विषाणू आहे जो पुन्हा पुन्हा पसरत राहतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates

    पुढील बातम्या