मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona Virus In Maharashtra: येत्या दोन महिन्यात राज्यात Corona ची चौथी लाट?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं विधान

Corona Virus In Maharashtra: येत्या दोन महिन्यात राज्यात Corona ची चौथी लाट?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं विधान

Corona Virus In Maharashtra: कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका कायम आहे. यावरुनच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी मोठं विधान केलं आहे.

जालना, 10 मे: राज्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Patients) वाढत आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका कायम आहे. यावरुनच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. येत्या जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट (Fourth wave of corona) येण्याची शक्यता असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जालनामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी (Health Minister) हे वक्तव्य केलं आहे.

लसीकरणाचं प्रमाण वाढवणं हेच राज्यासमोरील आव्हान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे

राजेश टोपे म्हणाले की, जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरत असल्याचं वाटलं तर लसीकरणच तारणहार असणार आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं महाराष्ट्रासमोर महत्वाचं काम असणार आहे. आरोग्य विभाग याबाबतीत अत्यंत सजग आणि जागरुक राहून लसीकरणाचं काम करतंय.

कोरोनाची मुंबईतली सद्यस्थिती

मुंबईतील कोरोनाचा प्रसार वेगानं वाढत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून हा वेग वाढताना दिसतोय. मुंबईत कोरोनाबाधितांचं प्रमाण सध्या दोन टक्क्यांच्याही वर पोहोचलं आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases, Rajesh tope