मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनावरील आयुर्वेदीक औषध घेण्यासाठी हजारोंची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोनावरील आयुर्वेदीक औषध घेण्यासाठी हजारोंची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेचा सध्या संपूर्ण देश सामना करत आहे. कोरोना व्हॅक्सिन घेण्यासाठी सामान्य माणसांना चांगलाच संघर्ष करावा लागत आहे. याच काळातच देशात गैरसमज निर्माण करणाऱ्या काही औषधाांचा देखील प्रचार केला जात आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नेल्लूर (आंध्र प्रदेश), 21 मे: कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेचा सध्या संपूर्ण देश सामना करत आहे. कोरोना व्हॅक्सिन घेण्यासाठी सामान्य माणसांना चांगलाच संघर्ष करावा लागत आहे. याच काळातच देशात गैरसमज निर्माण करणाऱ्या काही औषधाांचा देखील प्रचार केला जात आहे. आंध्र प्रदेशातूनही (Andhra Pradesh) अशीच एक घटना समोर आली आहे. राज्यातील नेल्लोर जिल्ह्यामधील कृष्णापट्टनम गावातामध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदीक औषध (ayurvedic medicine) दिले जात आहे. हे औषध घेण्यासाठी हजारोंची गर्दी होत आहे. यामध्ये काही कोरोना पेशंट्स असल्याची देखील माहिती आहे.

आनंददया असे हे औषध देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या औषधापासून कोरोना बरा होतो असा दावा त्याने केला आहे. हे वृत्त वाऱ्याच्या वेगानं सर्वत्र पसरले. त्यामुळे हे औषध घेण्यासाठी दुरच्या गावातील नागरिक देखील तिथे गर्दी करत आहे. या वाढत्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून काही जणांनी या प्रकरणाची तक्रार लोकायुक्तांकडे केली आहे.

स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी या औषधाची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या औषधाच्या विक्रीवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. या औषधाची तपासणी हैदराबादमधील आयुष मंत्रालयाच्या प्रयोगशाळेत केली जाणार आहे.

सावधान! AC चा वापर करताय? कोरोनाच्या प्रसारास ठरतोय कारणीभूत, सरकारनं दिला इशारा

स्थानिक आमदारांचा पाठिंबा

जिल्हा प्रशासनानं या औषधाला बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे. स्थानिक आमदार काकानी गोवर्धन रेड्डी यांनी आंनददया यांना पाठिंबा दिला आहे.या औषधाचे कोणतेही साईड इफेक्टस होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात आपण राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आंध्र प्रदेशात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. आयुर्वेदीक औषध मिळत असलेले गाव आणि आजूबाजूच्या परिसरात देखील अनेक कोरोना पेशंट्स आढळले आहेत. या बिकट परिस्थितीमध्ये लोकांचा अंधविश्वास देखील वाढत चालल्याचं पाहयला मिळत आहे.

First published:

Tags: Andhra pradesh, Corona vaccine, Coronavirus