मुंबई, 28 मे : देशात कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. देशात बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. वेळेवर औषधं आणि इतर सुविधा न मिळाल्यानं अनेकांना जीव गमवावा लागला आहे. देशात अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा साठा संपल्याने कित्येक रुग्ण दगावले. अशा कठीण काळात अनेक जण आपल्याला जमेल तसं कोरोनाबाधितांची मदत करत आहे. यामध्ये अगदी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी (movie stars), खेळाडू (sportspeople), उद्योजकांचाही (industrialists) समावेश आहे.
भारतातील कोरोनाची (Covid-19) भीषण परिस्थिती पाहून चिंतातूर झालेल्या यूकेतील एक खेळाडू अनोख्या पद्धतीने भारतासाठी फंड गोळा करत आहे. या उपक्रमातून मिळणारा निधी तो भारताला कोरोनाविरोधातील लढ्यासाठी देणार आहे. रामा गुडीमेटला (Rama Gudimetla) असं या खेळाडूचं नाव आहे. त्याने दररोज कमीत कमी 10 किलोमीटर धावण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम तो 100 दिवस करणार आहे. तसंच त्याने भारतासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स (oxygen concentrators to India) पुरवण्यासाठी लोकांनी मदत करावी, असं आवाहन त्याच्या सोशल मीडिया पेजवरून केलं आहे.
गुडीमेटला म्हणतो, की अजूनही भारताला मदतीची गरज आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स रुग्णालयात पोहोचवून आपण अनेक रुग्णांची मदत करू शकतो.
ऑक्सिजन सिलिंडर्समध्ये (oxygen cylinders) काँटेन फिनाईट ओ2 असतो. एक कॉन्सन्ट्रेटर सतत हवेतून ऑक्सिजन तयार करतो आणि तो रुग्णांना पुरवला जातो. गुडीमेटला याने आतापर्यंत 780 युरो म्हणजेच 80 हजार रुपये गोळा केले असून, 1 हजार युरो इतका फंड गोळा करण्याच त्यांचं लक्ष्य आहे.
त्याच्या फंडरेझिंग पेजवरील माहितीनुसार, तो 'द ब्रिटिश एशियन ट्रस्ट'साठी पैसे गोळा करत आहे. या ट्रस्टकडून ‘ऑक्सिजन फॉर इंडिया इमर्जन्सी अपील’ (Oxygen for India Emergency Appeal) नावाची मोहीम चालवली जात आहे. तो म्हणाला, या मोहिमेच्या माध्यमातून ऑक्सिजनची सर्वाधिक गरज असणाऱ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स बसवले जातील.
गुडीमेटलाने त्याच्या या उपक्रमाला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात केली आहे. त्याने स्वतःपुढे दोन आठवडे सलग हा उपक्रम करण्याचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर याची सवय लागल्यामुळे त्याने 31 दिवस, आणि पुढे 50 दिवसांपर्यंत सलग हा उपक्रम केला. पुढे आपल्या या उपक्रमाचा भारतातील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा यासाठी त्यांनी 100 दिवसांपर्यंत हे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
अशाप्रकारे भारताबाहेरूनही भारतातील कोविडविरुद्धच्या लढाईला मदत मिळत आहे. काही जण संस्थात्मक पातळीवर तर रामासारख्या व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, England