Home /News /coronavirus-latest-news /

एकीकडे ऑक्सिजनअभावी जातोय जीव; 'या' व्यक्तीने वाचवले 900 हून अधिक रुग्णांचे प्राण

एकीकडे ऑक्सिजनअभावी जातोय जीव; 'या' व्यक्तीने वाचवले 900 हून अधिक रुग्णांचे प्राण

ऑक्सिजन मॅन म्हणून गौरव यांची मिशन मोडमध्ये येण्याची ही कथा खूपच प्रेरणादायी आहे. साधारण एक वर्षापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये त्यांना अर्धांगवायू झाला होता.

    पाटणा, 21 एप्रिल : त्यांचे खरं नाव माहित नसलं तरी लोकं त्यांना ऑक्सिजन मॅन (Oxygen Man) म्हणून ओळखतात. त्यांचं नाव आहे गौरव रॉय (Gaurav Rai) रुग्ण कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्यामुळे गृह अलगीकरणात (Home Isolation) आहेत त्यांना ते प्रामुख्याने सेवा देतात. विशेष म्हणजे, या सेवेचा कोणताही मोबदला ते घेत नाहीत. गेल्या एक वर्षापासून कोणतिही सुट्टी न घेता ते ही सेवा देत आहेत. या निरपेक्ष सेवेमुळेच गौरव यांना ऑक्सिजन मॅन अशी ओळख मिळाली आहे. 52 वर्षीय गौरव रॉय यांना गेल्या जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे त्यांना तातडीने पाटणा मेडिकल कॉलेजमध्ये (Patna Medical College) आणण्यात आले परंतु दुर्दैवाने त्यांना येथे बेड उपलब्ध झाला नाही. ही कोरोनाची पहिली लाट होती. आणि वॉर्डच्या पायरीवर गौरव अत्यावस्थेत बसले होते. कारण त्यांची ऑक्सिजन लेव्हल खूप खालावली होती. त्यावेळी त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये एकही ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नव्हता. त्यांच्या पत्नीला आक्सिजन सिलिंडरची खासगी व्यवस्था करण्यासाठी 5 तासांचा कालावधी लागला. ही घटना गौरव यांच्या आयुष्याला वळण देणारी ठरली. गौरव बरे होऊन घरी परतल्यानंतर त्यांनी ऑक्सिजन निर्मिती करण्याचं ठरवले आणि त्यानंतर एकही क्षण त्यांनी उसंत घेतली नाही. या दांपत्यानं पैशांची जुळवाजुळव करत तळघरात ऑक्सिजन बॅंक (Oxygen bank) सुरु केली. ही बातमी जसजशी पसरु लागली तसतशी त्यांच्या फेसबुक आणि व्टिटरवरील मित्रांनी मदतीचा हात पुढे केला. 10 ऑक्सिजन सिलिंडरपासून सुरु झालेल्या या बॅंकेत सध्या 200 पेक्षा अधिक सिलेंडर उपलब्ध आहेत. या दांपत्याचे काम बघून त्यांना अनेकांनी सिलिंडर दान दिले किंवा त्यासाठी मदत दिली. हे ही वाचा-..म्हणून त्या दिवशी अश्रू अनावर झाले, डॉ.तृप्ती यांनी सांगितले कारण... ही एक अथक प्रक्रिया आहे. दररोज वेळी अवेळी गरजू रुग्णांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे कॉल्स येत असतात. अशावेळी मी माझ्या छोट्याशा वॅगनआर गाडीत सिलिंडर लोड करतो आणि रुग्णापर्यंत पोहोचवतो. रुग्ण बरे झाल्यानंतर सिलिंडर परत घेऊन येतो. जेणेकरुन एखाद्या गरजू रुग्णासाठी ते परत वापरता आले पाहिजेत. हे सर्व मी निःशुल्क करतो. याकामासाठी मी कोणताही अर्थिक मोबदला घेत नाही, असे गौरव रॉय सांगतात. गौरव यांच्या सेवेचा 96 रुग्णांना लाभ झाला असून, त्यांनी गौरव यांच्याकडील सिलिंडर वापरले आहेत. घरातून सुरु झालेल्या या सेवेचा विस्तार आता वाढला असून बिहारमधील 18 जिल्ह्यांमध्ये ही सेवा पोहोचलेली आहे. या ऑक्सिजन बॅंकेचा विस्तार झाला असला तरी व्यवसाय वाढलेला नाही. कारण ही सेवा विनामूल्य (Free Service) दिली जात आहे. ऑक्सिजन मॅन म्हणून गौरव यांची मिशन मोडमध्ये येण्याची ही कथा खूपच प्रेरणादायी आहे. साधारण एक वर्षापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये त्यांना अर्धांगवायू झाला. त्यामुळे ते बोलू शकत नव्हते. परिणामी त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला. आयुष्य संपवण्याच्या विचारात एका रात्री ते गंगा नदीवर गेले. पण वेळेनं त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच आखलं होतं. त्यामुळे गौरव हे स्वतःचा जीव घेण्याऐवजी जीवन तारणारे ठरले. त्यांचा रस्ता सुनियोजित नव्हता. मात्र त्यांचा उद्देश हाच आहे की जो पर्यंत साधनं हाताशी आहेत आणि तो हालचाल करु शकतो तोपर्यंत रात्रंदिवस जीव वाचवतच राहणार.
    First published:

    Tags: Corona updates, Oxygen supply

    पुढील बातम्या