मुंबई, 30 जून : कोरोनाची (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) फार बागुलबुवा बाळगण्याची गरज नसून लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेएवढी मोठी नसेल, असा अंदाज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनं (TIIFR) नोंदवला आहे. नागरिकांच्या शरीरातील अँटिबॉडिज (Antibodies) कमी झाल्या आणि अगोदर लागण होऊन गेलेल्यांना पुन्हा कोरोना झाला, तर आणि तरच तिसरी लाट भयंकर स्वरूप धारण करू शकते. मात्र तशी शक्यता सध्या तरी दिसत नसल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
हे आहे कारण
टाटा इन्स्टिट्यूने तयार केलेल्या मॉडेलनुसार 1 जूनपर्यंत सुमारे 80 टक्के मुंबईकरांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. यापैकी झोपडपट्टीत राहणाऱ्या 90 टक्के नागरिकांना तर इतर 70 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे. त्यामुळे 80 टक्के मुंबईकरांच्या शरीरात सध्या कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज आहेत. त्यात कोरोना न झालेल्यांपैकी काहीजणांनी लसीकरण केल्यामुळे त्यांच्याही शरीरात अँटिबॉडिजचं प्रमाण मुबलक आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागरिकांना फारसा त्रास होणार नाही आणि ही लाट काही फार मोठा कळस गाठणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हे वाचा - चिंताजनक बातमी, देशात कोरोना रुग्णांमध्ये आढळला नवा धोका
डेल्टा व्हायरसची भीती
डेल्टा व्हायरस हा शरीरातील अँटिबॉडिजना प्रतिसाद देतो की नाही, याबाबत सध्या संशोधन सुरू असून कुठलाच ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. आतापर्यंत डेल्टा प्लसची बाधा झालेल्यांपैकी बहुतांश नागरिक हे लसीकरण न झालेले आहेत. त्यामुळे शरीरातील अँटिबॉडिज या डेल्टा प्लस व्हायरसचा निकामी करण्यासाठी सक्षम असल्याचं सिद्ध होत आहे. मात्र तरीही याबाबत ठोस निष्कर्ष समोर येईपर्यंत शंकेला वाव उरणारच असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात.
टीआयएफआरमधील संदीप जुनेजा आणि दक्ष मित्तल या विद्यार्य़ांनी हे मॉडेल तयार केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus