मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

लॉकडाऊनमध्ये बंद बारमध्ये चोरांनी टाकली धाड; चार दिवसात दारू केली फस्त आणि...

लॉकडाऊनमध्ये बंद बारमध्ये चोरांनी टाकली धाड; चार दिवसात दारू केली फस्त आणि...

चोरांनी तेथील दारू पिऊन फस्त केली. याशिवाय येथील अन्य सामानही लंपास केले.

चोरांनी तेथील दारू पिऊन फस्त केली. याशिवाय येथील अन्य सामानही लंपास केले.

चोरांनी तेथील दारू पिऊन फस्त केली. याशिवाय येथील अन्य सामानही लंपास केले.

  • Published by:  Meenal Gangurde

रायपुर, 30 एप्रिल : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राजधानी रायपुरसह संपूर्ण प्रदेशात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. लॉकडाउनमध्येही चोर सक्रीय आहे. भाठागांवमध्ये जिलेट बारमध्ये चार चोरांनी धाड टाकली. आणि तेथील दारू पिऊन फस्त केली. याशिवाय येथील अन्य सामानही पळवले. पोलिसांनी आता संशयितांकडून चौकशी सुरू केली आहे. चोरांचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

रायपूरमध्ये 9 एप्रिलपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिक संस्था पूर्णपणे बंद आहे. लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा लोकांसाठी उपलब्ध आहेत. राजधानीत पोलीस लॉकडाऊन पूर्वीपासून रस्त्यावर गस्त घालत आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांची एक गट प्रमुख रस्त्यावरुन जात होता. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल याबाबत स्पष्ट संकेत देण्यात आले होते. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसून येत होते. भाठागाव स्थित जिलेट बारमध्ये सातत्याने चार दिवस चोर चोरी करीत होते. इतकच नाही तर त्यांनी बारमधील दारूही फस्त केली. बारमधील स्नॅक्सही संपवले.

हे ही वाचा-बापरे!  राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता

बारमध्ये 50 महागड्या दारूच्या बाटल्या, टीव्ही, स्वयंपाक घरातून कांदा-बटाट्याच्या गोण्या, एलईडी दिवे, सॉस आणि स्वयंपाक घरातील भांडीची चोरी केली होती. बारचे संचालकाच्या कुटुंबातील सदस्य कोरोना संसर्गाचा सामना करीत आहे. ते रुग्णालयाच्या फेऱ्या मारून आधीच हैराण झाले आहेत. त्यात चोरांनी त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

भारतात दुसऱ्या लाटेत आढळलेला कोरोनाचा डबल म्युटंट व्हेरियंट (Covid19 virus double mutant varient) जगातील इतर 17 देशांमध्ये आढळला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंगळवारी म्हटलंय. भारतात आढळलेल्या या व्हेरियंटला B.1.617 असं नाव देण्यात आलंय. हा व्हेरियंट सर्वात आधी भारतात आढळला होता. त्यानंतर GISAID ओपन-अ‍ॅक्सेस डेटाबेस वर अपलोड केलेल्या 1,200 पेक्षा जास्त सिक्वेंसमध्ये हा 17 देशात पसरल्याची माहिती मिळाली आहे.

First published:

Tags: Corona updates, Lockdown