Home /News /coronavirus-latest-news /

दारू आणि कोरोना; दोघांमधील खास कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का?

दारू आणि कोरोना; दोघांमधील खास कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का?

Alcohol and Coronavirus: एका नवीन संशोधनानुसार, काही प्रकारच्या अल्कोहोलचं सेवन केल्याने कोरोनाचा धोका कमी होतो, तर काही प्रकारांमुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.

मुंबई, 28 जानेवारी: सगळ्या जगाला गेल्या दोन वर्षांपासून वेठीला धरणाऱ्या कोरोना विषाणूच्या साथीच्या संकटातून (Coronavirus Pandemic) सुटका व्हावी यासाठी जगभरात वेगवेगळ्या स्तरावर संशोधन सुरू आहे. वेगवेगळी औषधं, लशी विकसित करण्याबरोबरच खाणं-पिणं, आहार यांबाबतही अभ्यास करून त्याबाबत सल्ले देण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर आणि संसर्ग होऊ नये यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गेल्या दोन वर्षांत शास्त्रज्ञांनी खाण्या-पिण्याबाबत अनेक सल्ले दिले आहेत. आजही या विषयावर संशोधन सुरू आहे. यातलंच एक महत्त्वाचं संशोधन आहे ते म्हणजे अल्कोहोल सेवन आणि कोरोना विषाणू (Alcohol and Coronavirus) यांच्यातल्या परस्परसंबंधाविषयीचं. याबद्दलच्या एका नवीन संशोधनानुसार, काही प्रकारच्या अल्कोहोलचं सेवन केल्याने कोरोनाचा धोका कमी होतो, तर काही प्रकारांमुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. चीनमधल्या (China) शेनझेन कांगनिंग हॉस्पिटलमध्ये ब्रिटिश नागरिकांशी संबंधित डेटाचं विश्लेषण करून हा संशोधन अहवाल तयार करण्यात आला आहे. संशोधकांनी ब्रिटनमधल्या नागरिकांच्या मद्यपानाच्या सवयी आणि कोरोना संसर्गाच्या माहितीचं विश्लेषण केलं. त्यातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. हे वाचा-कोरोनानंतर आणखी एका धोकादायक विषाणूची दहशत, तीन पैकी एकाचा होऊ शकतो मृत्यू! या संशोधन अहवालानुसार, ज्या व्यक्ती आठवड्यातून 5 ग्लास किंवा त्याहून अधिक रेड वाइनचं (Red Wine) सेवन करतात त्यांना कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका 17 टक्क्यांनी कमी असतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, रेड वाइनमध्ये पॉलीफेनॉल नावाचं संयुग असतं. ते व्हायरल फ्लू (Viral Flu) आणि श्वसनसंस्थेशी निगडित इतर रोगांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त असतं. यामुळेच रेड वाइनचे सेवन करणाऱ्यांमध्ये कोरोना संसर्गाचा धोकाही कमी होऊ शकतो. रेड वाइनप्रमाणे व्हाइट वाइन (White Wine) आणि शॅम्पेनमुळेही (Champagne) कोरोना संसर्गापासून धोका कमी होऊ शकतो. ज्या व्यक्ती आठवड्याभरात 1 ते 4 ग्लास व्हाइट वाइन किंवा शॅम्पेन पितात, त्यांचा कोविड संसर्गाचा धोका 8 टक्क्यांनी कमी होतो, असं या संशोधनात आढळल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. हे वाचा-अरे देवा..! मुंबईत Omicron च्या वाढत्या रुग्णांसोबत आढळला Black Fungus चा रुग्ण मात्र बीअर (Beer) आणि सायडर (Cider) पिणाऱ्यांना कोरोना होण्याची शक्यता 28 टक्के जास्त असते. एका आठवड्यात 5 ग्लास किंवा त्याहून अधिक बीअर आणि सायडर पिणाऱ्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. तसंच जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळं जास्त प्रमाणात मद्यपान करू नये असा सल्ला शास्त्रज्ञ देतात.
First published:

Tags: Alcohol, Corona, Coronavirus

पुढील बातम्या