कोरोनातून बरं झाल्यानंतर 'या' चाचण्या गरजेच्या, आरोग्यावर झालेल्या परिणामांची मिळेल माहिती

कोरोनातून बरं झाल्यानंतर 'या' चाचण्या गरजेच्या, आरोग्यावर झालेल्या परिणामांची मिळेल माहिती

कोरोना विषाणूमुळे शरिरातील अनेक भागांचे नुकसान होते. फुफ्फुस आणि रोगप्रतिकार यंत्रणेवर (Lungs and immune systems) याचा सर्वात जास्त परिणाम होतो.

  • Share this:

नवी दिल्ली 04 मे : देशात कोरोनाचे दररोज साडेतीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचं निदान आरटीपीसीआर (RT-PCR) टेस्ट रिपोर्टमध्येही (Test Report) होत नाहीये. त्यामुळे बऱ्यादचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असूनही त्याचा रिपोर्ट (Corona Negative Report) निगेटीव्ह येतो. म्युटेंट झालेला व्हायरस आरटीपीसीआर (RT-PCR) आणि अँटिजेन किटलादेखील धोका देतोय. म्हणजेच कोरोना पॉझिटिव्ह असूनही त्या व्यक्तीचा चाचणी अहवाल निगेटीव्ह येत आहे. यामुळे संसर्ग नियंत्रित करणं अधिक कठीण झालं आहे. अशावेळी खबरदारी घेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणं आवश्यक असतं.

तुम्ही कोरोनातून बरे झाला असाल तर त्यानंतर काही टेस्ट करून घ्या. जेणेकरून कोरोना विषाणूने तुमच्या शरीराचं किती नुकसान केलंय, हे या टेस्ट केल्यास तुम्हाला कळेल. चला तर जाणून घेऊया कोरोनातून बरं झाल्यानंतर कराव्या लागणाऱ्या टेस्ट्स.

अँटीबॉडी टेस्ट -

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूमुळे शरिरातील अनेक भागांचे नुकसान होते. फुफ्फुस आणि रोगप्रतिकार यंत्रणेवर (Lungs and immune systems) याचा सर्वात जास्त परिणाम होतो. म्हणून अँटीबॉडी टेस्ट (Antibody test) करून घ्या. या टेस्टमुळे तुमच्या शरिरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का, याबद्दल तुम्हाला कळेल. ही टेस्ट तुम्ही कोरोनातून बरे झाल्यानंतर 2 आठवड्यांनी करू शकता.

CBC Test -

CBC Test म्हणजे कंम्प्लिट ब्लड काऊंट टेस्ट (Complete blood count test). ही टेस्ट शरीरातील वेगवेगळ्या पेशींच्या तपासणीसाठी केली जाते. या टेस्टमुळे आपले शरीर कोरोना संसर्गाविरोधात कसा प्रतिकार करतंय याची कल्पना रुग्णाला येते. कोरोनातून बरं झाल्यानंतर ही चाचणी करणं खूप महत्वाचं आहे.

शुगर टेस्ट -

शुगर आणि कॉलेस्ट्रोल टेस्ट (Sugar and cholesterol tests) देखील गरजेची आहे. ज्या रुग्णांना मधुमेह आहे त्यांनी ही टेस्ट आठवणीने करून घ्यायला पाहिजे. अनेकदा कोरोना झाल्यानंतर रुग्णाच्या शरिरातील शुगर वाढते. त्यामुळे कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर शरिरातील साखरेचं प्रमाण जाणून घेण्यासाठी ही चाचणी करून घ्यावी. बऱ्याचदा गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांना क्रिएटिनिन (Creatinine), लिव्हर (Liver) आणि किडनी फंक्शन टेस्ट (Kidney function test) करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.त्यामुळे तुम्हीही जर कोरोनातून बरे झाले असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वरील चाचण्या करून घेऊ शकता.

Published by: Kiran Pharate
First published: May 4, 2021, 4:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या