लहान मुलांमध्ये दिसताहेत कोरोनाची ही लक्षणे; कशी घ्याल काळजी?

लहान मुलांमध्ये दिसताहेत कोरोनाची ही लक्षणे; कशी घ्याल काळजी?

COVID-19 Symptoms in Kids : कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave)ही पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक धोकादायक असल्याची दिसत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave)ही पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक धोकादायक असल्याची दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. मोठ्या माणसांसोबतच लहान मुलं (Childern)देखील कोरोनाबाधित होत आहेत. वयस्कर लोकांमध्ये कोरोनामुळे आजार बळावत असून काही लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यात कोणतिही लक्षणे दिसत नाहीत. परंतु कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये ताप आणि गॅस्ट्रोइंटेराईटिसची लक्षणे दिसून येत आहेत. मायो क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये कोरोनाची कोणती लक्षणे दिसतात आणि संसर्गानंतर त्यांची देखभाल कशी करावी याबद्दल जाणून घेऊया...

लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे

लहान मुले आणि वयस्कर लोकांमध्ये कोरोनाची जवळपास सारखीच लक्षणे दिसत आहेत. ज्यात थंडी वाजून येणं हे सारखं लक्षण आहे. अनेक मुलं एक ते दोन आठवड्यात पूर्णपणे बरी होताहेत. सर्वसाधारण कोरोनाची दिसून येणारी लक्षणे अशी

-थंडी आणि ताप

-नाक वाहणे

-खोकला

-घशात खवखव

-श्वास घेण्यास त्रास होणं

-थकवा

-डोकंदुखी

-स्नायू दुखणे किंवा अंगदुखी

-उलटी

-जुलाब

-डायरिया किंवा भूक कमी लागणे

-चव आणि वास न येणे

-पोटदुखी

जर तुमच्या बालकांमध्ये अशी लक्षणे दिसत असतील तर क्षणाचाही विलंब न करता तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधावा. मुलांना घरातील एखाद्या स्वतंत्र खोलीत आणि मेडीकल स्टाफ व्यतरिक्त अन्य व्यक्तींपासून दूर ठेवावे. शक्य असेल तर ज्या खोलीत स्वतंत्र बाथरुम आहे अशा खोलीतच मुलांना ठेवावे. घरातील अन्य व्यक्तींचे बाथरुम स्वतंत्र असावे. सीडीसीआर,डब्ल्यूएचओने (WHO)सांगितलेल्या कोरोना संबंधित आयसोलेशन (Isolation)आणि क्वारंटाईनच्या (Quarantine)नियमांचे पालन करावे. कोरोनाची तपासणी ही नाकाव्दारे स्वॅब (Nozal Swab)घेऊन केली जाते. या तपासणीसाठी बालकांची मानसिक तयारी करावी म्हणजे त्यांना तणाव जाणवणार नाही. असे केल्यास ते कोरोना स्टेटसाठी नक्कीच सपोर्ट करतील.

First published: April 15, 2021, 10:48 PM IST

ताज्या बातम्या