Home /News /coronavirus-latest-news /

'घरात अन्नाचा कणही नाही'; घरकाम करणाऱ्या महिलेची कहाणी ऐकून पोलिसांचे डोळेही पाणावले

'घरात अन्नाचा कणही नाही'; घरकाम करणाऱ्या महिलेची कहाणी ऐकून पोलिसांचे डोळेही पाणावले

Corona Lockdown in Aurngabad: हातावर पोट असणाऱ्या लोकांचे लॉकडाऊनमुळे काय हाल होतं आहेत? याच चित्र स्पष्ट करणारी ही घटना औरंगाबाद याठिकाणी घडली आहे.

    औरंगाबाद, 14 मे: कोरोना विषाणूच्या साथीमुळे (corona pandemic) मागील काही दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन (Lockdown in maharashtra) जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून लागू केलेल्या या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची पोटासाठी वणवण सुरू झाली आहे. कोरोनाच्या भीतीनं घरात बसलो तर भुकेनं तडफडून मरू अशी स्थिती त्यांची झाली आहे. अशात असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची स्थिती तर आणखीच बिकट आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचे लॉकडाऊनमुळे काय हाल होतं आहेत? याचं चित्र स्पष्ट करणारी घटना औरंगाबाद याठिकाणी घडली आहे. येथील एका घरकाम करणाऱ्या महिलेच्या घरात अन्नाचा एक कणही उरला नाही. त्यामुळे आपल्या तीन मुलांचा सांभाळ कसा करायचा, या प्रश्नानं घाबरलेल्या महिलेनं कामासाठी पोलिसांची मदत मागितली आहे. साहेब मला मदत नकोय, फक्त काम द्या, माझ्या घरात अन्नाचा एक कणही उरला नाही, अशा शब्दांत महिलेनं मदत मागितल्यानंतर पोलिसांचे डोळेही पाणावले. संबंधित महिलेच्या पतीचं पाच वर्षांपूर्वी निधन झालं आहे. तेव्हापासून ही महिला घरकाम करून आपल्या तीन मुलांचा उदरनिर्वाह चालवत होती. दरम्यानच्या काळात लॉकडाऊनमुळे घरकाम सुटलं आणि नव्यानं दुसरं कोणतं कामही मिळालं नाही. त्यामुळे ही असहाय्य महिला पुरती संकटात सापडली होती. आतापर्यंत तिनं आपल्या मुलांचा आणि स्वतःचा कसाबसा उदरनिर्वाह चालवला. पण मागील काही दिवसांपासून किराणा सामान आणण्यासाठीही पैसे उरले नाहीत. त्यामुळे उपाशीपोटी झोपण्याची वेळ मुलांवर आली आहे. घरकाम करून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करणाऱ्या या महिलेची कहाणी ऐकून पोलिसांनी तिची मदत केली आहे. हे ही वाचा-'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार कोरोना नियमात काही जणांना सूट देऊन पोलिसांनी वर्गणी काढून महिलेला 45 किलो किराणा घेऊन दिला आहे. तसेच काम मिळवून देण्याची हमीही पोलिसांनी दिली आहे. शिवाय रिक्षा करून त्यांना घरी सोडण्याची व्यवस्थाही पोलिसांनी करून दिली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Corona updates, Lockdown

    पुढील बातम्या