Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाचा धोका कायम; दिल्लीच्या दुसऱ्या टप्प्यातील सीरो सर्व्हेतून आली धक्कादायक माहिती

कोरोनाचा धोका कायम; दिल्लीच्या दुसऱ्या टप्प्यातील सीरो सर्व्हेतून आली धक्कादायक माहिती

महाराष्ट्रातलेच नाही तर कोरोनाचे देशातले हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई आणि पुण्यात रुग्णांचा आलेख पहिल्यांदाच घसरणील लागला असून आता पुन्हा लाट येऊ नये म्हणून जास्त सावध राहण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे.

महाराष्ट्रातलेच नाही तर कोरोनाचे देशातले हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई आणि पुण्यात रुग्णांचा आलेख पहिल्यांदाच घसरणील लागला असून आता पुन्हा लाट येऊ नये म्हणून जास्त सावध राहण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून येत आहे

    नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : देशात अद्यापही कोरोनाचा धोका कायम आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाकडूनही चिंता व्यक्त केली आहे. त्यातचं मुंबईसह दिल्लीतील सीरो सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.  दिल्लीत दुसऱ्या टप्प्यातील सीरो सर्व्हेमधून 29.1 टक्के कोरोनाचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे. पहिल्या सर्वेक्षणातून हा आकडा 23.5 टक्के इतका होता, अशी माहिती ICMR ने दिली आहे. सीरो सर्व्हेमधून देशावर अद्यापही कोरोनाचा धोका असल्याची माहिती समोर येते, असे आराग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. पहिल्या सीरो सर्व्हेमध्ये देशातील 73 टक्के लोकसंख्येवर कोरोना संसर्ग होण्याचा अंदाज होता, आता हे प्रमाण 7.3 टक्के आहे. देशात 7 कंपन्या रेमिडेसिवीरची निर्मिती करीत आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्वत्र सहजपणे उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सरकारकडे कोरोना लशीसाठी 80000 कोटी रुपयांच्या बजेटवर आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 80 हजार कोटी रुपयांची गरज लागेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भारत सरकारने लशीबाबत डॉ. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे. यामध्ये लशीबाबत लोकांमध्ये प्राथमिकता देण्याबाबत चर्चा झाली. त्याशिवाय बजेटचाही अंदाज लावण्यात आला आहे. त्यातच दिल्लीच्या दुसऱ्या टप्प्यात सीरो सर्वेमध्ये 29.1 टक्के कोरोनाचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे. पहिल्या सर्व्हेमध्ये हा आकडा 23.5 टक्के होता, अशी माबिती आयसीएमआरने दिली आहे. हे ही वाचा-धक्कादायक! 'क्वारंटाइन'मुळेच झाला कोरोना; 18 हजार संक्रमित, 700 लोकांचा मृत्यू दुसऱ्या सीरो सर्व्हेमध्ये 10 वर्षांहून जास्त वयाच्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार 6.6 टक्के झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील झोपडपट्टी भागात 15.6 टक्के आणि विना झोपडपट्टी भागात 8.2 टक्के प्रसार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ग्रामीण झोपडपट्टी भागात 4.4 टक्के प्रसार झाला आहे. काय आहे सीरो सर्व्हे देशातील हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट झोनमध्ये कोरोनाचा प्रसार किती झाली याची नेमकी माहिती या सर्व्हेतून होते. यामध्ये किती नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या याची माहिती मिळते. यानुसार अनेक नागरिकांना कोरोनाची लागण झालेली असते मात्र त्यांना लक्षणं न दिसल्याने त्यांची नोंद होत नाही. या सीरो सर्व्हेतून परिस्थितीत अधिक धोकादायक असल्याची माहिती समोर येते. आयसीएमआर आणि राज्यातील आरोग्य विभागाच्या मदतीने रँडम सॅम्पलिंग घेत हा सर्व्हे केला जातो. यामध्ये अनेकदा नागरिकांचे रक्त घेतले जाते व त्यांची अँटीबॉडी टेस्ट केली जाते. दुसरा सीरो सर्व्हे हा 17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर यादरम्यान झाला होता. 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे. पहिला सीरो सर्व्हे 11 मे ते 4 जूनदरम्यान झाला होता. यात 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यात हा सर्व्हे करण्यात आला होता, त्यावेळी 0.73 टक्के संसर्ग झाला होता. चांगली बाब म्हणजे देशातील कोरोनाचे एकूण 15.4 टक्के रुग्ण सक्रिय असून बरे होणाऱ्यांची संख्या 83 टक्के इतकी आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Delhi

    पुढील बातम्या