Home /News /coronavirus-latest-news /

देशातील धक्कादायक वास्तव; कोरोनाच्या पहिल्या लाटेत पतीचं निधन, दुसऱ्या लाटेत नोकरी गेली, 2 महिन्यांपर्यंत 6 जणं अन्नाशिवाय

देशातील धक्कादायक वास्तव; कोरोनाच्या पहिल्या लाटेत पतीचं निधन, दुसऱ्या लाटेत नोकरी गेली, 2 महिन्यांपर्यंत 6 जणं अन्नाशिवाय

कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेने कुटुंब उद्ध्वस्त झालं. इतकं की या कुटुंबाच्या घरात गेल्या दोन महिन्यांपासून खाण्यासाठी अन्नाचा एक कणही नव्हता.

    अलीगड, 17 जून : उत्‍तर प्रदेशातील अलिगड भागात एका 45 वर्षीय महिला आणि तिची पाच मुलं उपासमारीमुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. एका स्थनिक स्वयंसेवी संघटनेने सांगितल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या कुटुंबाकडे रेशन आणि आधार कार्डदेखील नाही. अलिगडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. या महिलेच्या पतीचा कोरोना महासाथीच्या पहिल्या लाटेदरम्यान लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान मृत्यू झाला. घरातील कमावणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. त्यांचा मोठा मुलगा 20 वर्षांचा आहे. तो छोटी-मोठी कामं करतो. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याचीही नोकरी गेली. त्यानंतर घरावर मोठं संकट कोसळलं. सध्या महिलेसह तिची पाच मुलं रुग्णालयात दाखल आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, यांना चांगलं जेवण मिळालेलं नाही. गेल्या दोन महिन्यांपासून हे कुटुंब अन्नाशिवाय जगत आहे. उपासमारीमुळे ते अशक्त झाले आहेत. रुग्णालयात त्यांना पौष्टिक अन्न दिलं जात आहे. स्थानिक पत्रकारांनी ही परिस्थिती आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. या व्हिडीओमध्ये मुलांची हाडं दिसत आहेत. पौष्टिक अन्नाबरोबर त्यांना रुग्णालयात ग्लुकोजही लावण्यात आलं आहे. याबाबत महिलेने सांगितलं की, घरात खायला काहीच नव्हतं. गेल्या तीन महिन्यांपासून हीच परिस्थिती आहे. भूक आणि आजारपण यामुळे मुलांमधील अशक्तपणा वाढला आहे. शेजाऱ्यांनी काही दिवस खायला दिलं. मात्र दररोज शेजारचे देऊ शकत नव्हते. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा-पिंपरीतील संतापजनक प्रकार! सख्ख्या भावानेच बहिणीवर केला बलात्कार महिलेने पुढे सांगितलं की, तिने गावातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मदतीने मागणी केली होती. मात्र त्यांनी हात वर केले. त्यांच्याकडे 100 रुपये मागितले होते, मात्र तेदेखील त्यांनी दिले नाही. रेशन कार्ड नसल्याने रेशनमधूनही काहीच अन्न-धान्य मिळालं नाही. याबाबत अलिगडचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट चंद्रभूषण सिंह यांनी ही बाब हैराण करणारी असल्याचं सांगितलं. याबाबत अधिक चौकशी करुन त्या कुटुंबाचे आधारकाडे आणि रेशन कार्ड तयार करवून घेतले जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona spread, Uttar pradesh news

    पुढील बातम्या