मेरठ, 21 फेब्रुवारी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात नियमावली अधिक कडक करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत आटोक्यात असलेली कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान नागरिकांनी अधिक सावधान राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे प्रत्येक ठिकाणी मास्क परिधाण करणे अनिवार्य असून लग्नांमध्ये उपस्थितांच्या संख्येमध्ये मर्यादा लावण्यात आली आहे.
दरम्यान एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ मेरठ येथून असून एका लग्नातील आहे. लग्नामध्ये एक आचारी पोळ्या (रोटी) तयार करीत असताना त्यावर थुंकत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ ट्वीटवर पोस्ट करण्यात आला असून यावर कारवाईची मागणी केली आहे. हा व्हि़डिओ मेरठ येथील एरोमा हॉटेलमधील असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मेरठ पोलिसांनी संंबंधित ठाण्याचे प्रभारी यांना आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.
@sachingupta787 वीडियो की जांच हो ,तुरन्त कैटरर्स और सुहैल पर कार्यवाही हो ,वीडियो एरोमा होटल मेरठ की बताई जा रही है।@meerutpolice @Uppolice @dgpup @AmarUjalaNews @JagranMeerut @Live_Hindustan pic.twitter.com/8Ik1xc7AUT
— शैंकी वर्मा,प्रसपा नेता,मेरठ (@shankyvermapspl) February 19, 2021
उक्त प्रकरण के संबंध में थाना प्रभारी परतापुर को आवश्यक कार्रवाई/ जांच हेतु अवगत करा दिया गया है
— MEERUT POLICE (@meerutpolice) February 19, 2021
हे ही वाचा-Covid-19 ची लस घेतल्याच्या 2 आठवड्यांनंतर जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाच्या काळात अशा अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांना अधिक सावधान राहणं गरजेचे आहे. शक्यतो लग्न, समारंभात जाणं टाळावं, किंवा अधिक काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं. या व्हिडिओमध्ये स्वयंपाकी प्रत्येक पोळीवर खाली तोंड करुन थुंकत आहे व कोणी आपल्याला पाहत आहे की नाही हे देखील तपासत आहे. त्यामुळे अशा विकृतीवर कारवाई करण्याचं मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.
आरोपीला अटक
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आचारी नान तयार करीत आहे. या व्हिडिओनंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आरोपी नौशाद याला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india