राज्यात विक्रमी रुग्णांनी केली ‘कोरोना’वर मात, मार्केटमध्ये गर्दी वाढल्याने सरकारला चिंता

राज्यात विक्रमी रुग्णांनी केली ‘कोरोना’वर मात, मार्केटमध्ये गर्दी वाढल्याने सरकारला चिंता

राज्यातल्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ही आता लाखाच्याही खाली आली असून राज्यभरात सध्या 96 हजार 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई 8 नोव्हेंबर:  राज्यात रविवारी विक्रमी 8 हजार 232 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 5 हजार 92 नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही आता 15 लाख 77 हजारांवर गेली आहे. तर राज्याचा Recovery Rate हा 91.71 एवढा झाला आहे. दिवाळीला 8 दिवस राहिलेले असताना सध्या बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. या गर्दीमुळे सरकारची चिंता वाढली असून कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढू नये म्हणून उपयोजना काय करता येतील याचा विचार सुरू केला आहे.

राज्यात दिवसभरात 110 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे. राज्यातल्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ही आता लाखाच्याही खाली आली असून राज्यभरात सध्या 96 हजार 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सातत्याने कोरोनाचा आलेख (Maharashtra Covid-19 graph) कमी होतोय. त्यामुळे सगळ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकार आणि स्थानिका पालिकांनी मिळून जे सातत्याने काम केलं त्यामुळे हा आलेख घसरत असून त्याची 5 महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत.

राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग केल्यामुळे कोरोना रुग्णांना तातडीने उपचार मिळाले. त्यामुळे प्रसार रोखला गेला. आरोग्य यंत्रणा नुसती टेस्टिंगच करून थांबली नाही तर कोविड रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांनी त्या माणसांना आयसेलोट केलं. त्यामुळे प्रसार रोखण्यात मदत झाली.

कोरोनामुक्तीचं प्रमाण 91 टक्क्यांच्या वर, 'मात्र दुसऱ्या लाटेचा धोका कायम'

कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मोठ्या शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स आणि हॉस्पिटल्सची सुविधा निर्माण केल्याने तातडीने उपचार केल्या गेलेत. राज्य स्तरापासून ते स्थानिक पातळीपर्यंत आरोग्य यंत्रणा वेगाने कामाला लागल्या त्यामुळे कोविड रुग्णांवर तातडीने उपचार केले गेले.

राज्य सरकारने ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम राबवल्याने कोविड रुग्ण शोधण्यास मदत झाली आणि जनजागृतीही झाली.

कोरोना टिपेवर असताना माध्यमांमुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे लोक सुरक्षा नियमांचं पालन सक्तीने करत होते.

आता काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी राज्यातही तसाच इशारा दिला आहे. आकडेवारी आणि जगभरातल्या देशांच्या अभ्यासावर तज्ज्ञांनी हे निष्कर्ष काढले असून त्यामुळे ही शक्यता व्यक्त केली जातेय.

BIG NEWS: मुंबईत गेल्या 3 महिन्यातली सर्वात कमी रुग्णसंख्या, मृत्यूमध्येही घट

मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि वारंवार हात धुणे यामुळेच कोरोनाला रोखता येतं हे तज्ज्ञ पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यामुळे सणा सुदीचे दिवस असले तरी बाजारात अनावश्यक गर्दी करू नका असा सल्लाही सरकारने दिला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 8, 2020, 8:47 PM IST

ताज्या बातम्या