आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा; महिलेला पाच मिनिटांच्या अंतराने कोविशील्ड आणि कोवॅक्सिनची मात्रा; प्रकृती बिघडली

आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा; महिलेला पाच मिनिटांच्या अंतराने कोविशील्ड आणि कोवॅक्सिनची मात्रा; प्रकृती बिघडली

65 वर्षीय महिलेला अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने वेगवेगळ्या लशींचे डोज देण्यात आले होते.

  • Share this:

पाटना, 18 जून : बिहारमध्ये कोरोना लसीकरणादरम्यान एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेला एकाच दिवसात कोविशील्ड आणि कोवॅक्सिनची लस देणअयात आली आहे. यानंतर मात्र महिलेची प्रकृती ढासळली आहे.

हा प्रकार पाटन्यातील पुनपुन भागात घडला आहे. येथे एका 65 वर्षीय महिला सुनीला देवी हिला कोरोनाची लस देण्यात आली होती. बुधवारी लसीकरणासाठी महिला सेंटरमध्ये पोहोचली. त्यानंतर जे काही झालं ते हैराण करणारं आहे. सुनीला हिला एकाच दिवसात अवघ्या 5 मिनिटांच्या अंतराने दोन्ही लशीचे डोस देण्यात आले. पहिली कोविशील्ड आणि दुसरी कोवॅक्सिनची. एकाच वेळी दोन लशी घेतल्यानंतर महिलेच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसू लागला. रात्रभर महिला तापाने फणफणली होती. मात्र इतकी मोठी चूक केल्यानंतरही आरोग्य विभागातून कोणीच तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलं नाही.

हे ही वाचा-3 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाखांचा दंड; कोरोनाचे नियम मोडणाऱ्याला भलीमोठी शिक्षा

आरोग्य विभागाच्या या चुकीनंतर तिला सांगण्यात आलं की, पुढील 24 तास ती डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहिल, मात्र तिच्यावर लक्ष देण्यासाठी एकही डॉक्टर पोहोचला नाही. महिलेच्या कुटुंबीयांनीच तिचा घसा कोरडा झाल्यानंतर ग्लुकोजचं पाणी प्यायला दिलं. कुटुंबीयांनी दावा केला आहे की, मेडिकल टीमला याबाबत सूचना देण्यात आली होती, मात्र कोणीच महिलेची तब्येत पाहाण्यासाठी आलं नाही. मेडिकल टीम येऊन महिलेवर उपचार करतील, या आशेने महिलेने कुटुंबीय त्यांची वाट पाहत राहिले. दरम्यान महिलेची प्रकृती खराब होत चालली होती. दरम्यान ज्या एएनएनने दुसरा डोज दिला होता ती महिलेला भेटण्यासाठी आली व तिने आपली चूक मान्य केली.

महिलेची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी कुटुंबीय प्रार्थना करीत आहेत. सध्या महिलेचा भाऊ आणि बहिण त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. संपूर्ण गाव या प्रकरणामुळे चिंता व्यक्त करीत आहे. शिवाय लसीकरणाबाबत लोकांमध्ये भीतीही निर्माण झाली आहे.

 

Published by: Meenal Gangurde
First published: June 18, 2021, 11:10 PM IST

ताज्या बातम्या