Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाग्रस्त गर्भवती पत्नीसाठी 8 तास भटकत होता पती; अखेर पहाटे मिळाली GOOD NEWS

कोरोनाग्रस्त गर्भवती पत्नीसाठी 8 तास भटकत होता पती; अखेर पहाटे मिळाली GOOD NEWS

चिमुरड्यांना कोरोनापासून वाचवा

चिमुरड्यांना कोरोनापासून वाचवा

अनेक शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं रुग्णालयांमध्ये तुडुंब गर्दी आहे. त्यामुळे रुग्णांना बेड न मिळणे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड न मिळणं, काही ठराविक औषधांचा तुटवडा अशा समस्या निर्माण झाल्या आहेत.

    भोपाळ, 17 एप्रिल : देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा (Corona) कहर सुरु आहे. कोरोना संसर्गामुळे अनेक ठिकाणी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं आरोग्य यंत्रणेवर (Health Care) मोठा ताण आला आहे. अनेक शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं रुग्णालयांमध्ये तुडुंब गर्दी आहे. त्यामुळे रुग्णांना बेड न मिळणे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड न मिळणं, काही ठराविक औषधांचा तुटवडा अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना या सर्व गोष्टी मिळवताना जीवाचं रान करावं लागत आहे. ही स्थिती असताना भोपाळमध्ये (Bhopal) काहीशी सुखद घटना पाहायला मिळाली आहे. कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेला 8 तास प्रयत्न करुनही बेड मिळाला नाही. मात्र मदत मिळताच या महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, एका पतीला आपल्या कोरोनाग्रस्त गर्भवती पत्नीला ऑक्सिजन बेड (Oxygen Bed) मिळावा यासाठी तब्बल 8 रुग्णालयांमध्ये भटकंती करावी लागली. गुरुवारी रात्री 1 वाजता हमीदिया रुग्णालयासमोर रुग्णवाहिकेत असलेल्या त्याच्या पत्नीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिची ही स्थिती पाहून पतीने देवाचा धावा सुरु केला. तेवढ्यात सोशल मीडियावरील एका मित्राने त्याला एका व्यक्तीचा फोन क्रमांक दिला. पतीनं त्या व्यक्तीला फोन करताच त्याने रेडक्रॉस रुग्णालयात या गर्भवती महिलेला बेड उपलब्ध करुन दिला. परंतु तेथे प्रसुतीची सुविधा नसल्यानं या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता या महिलेने एका निरोगी बालकाला जन्म दिला. हेही वाचा-कोरोनाचा ताण दूर करा! 'या' देशात पर्यटकांचं लसीकरण, सरकारकडून नवी योजना हा संपूर्ण घटनाक्रम शिवम दुबे यांनी कथन केला. ते म्हणाले,की माझी गर्भवती पत्नी प्रतिक्षाला 13 एप्रिल रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मी तिला जे.पी. रुग्णालयात दाखल केला. तिथे आरटीपीसीआर टेस्ट (RT-PCR Test)करण्यात आली. त्या दरम्यान अॅटिजेन टेस्टही (Antigen Test) करण्यात आली परंतु ती निगेटिव्ह आली. 2 दिवसांनी आरटीपीसीआरचा रिपोर्ट आला तो पॉझिटिव्ह होता. त्यानंतर माझ्या पत्नीची प्रकृती बिघडू लागली. मी गुरुवारी माझ्या जोखमीवर जे.पी. रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. त्यानंतर आॅक्सिजन बेड मिळावा यासाठी तिला रुग्णवाहिकेतून चिरायू, नॅशनल, सुल्तानिया, बंन्सल सहित 8 रुग्णालयात भटकंती केली. परंतु कोठेही आॅक्सिजन बेड मिळाला नाही. शेवटी मी रात्री 12 वाजता हमीदिया रुग्णालयात पोहोचलो. तेथील कोविड वॉर्ड समोर रुग्णावाहिका घेऊन उभा राहिलो. या दरम्यान एका ओळखीच्या व्यक्तीकडून भाजप नेता राहुल कोठारी यांचा फोन क्रमांक मिळाला. देवाचं नामस्मरण करीत मी त्यांना फोन लावला आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यांनी मला रेडक्रॉस रुग्णालयात (Redcross Hospital)जाण्यास सांगितले. मी रात्री 2 वाजता तिथे पोहोचलो. तेथील डॉक्टरांनी माझ्या पत्नीला आॅक्सिजन बेड उपलब्ध करुन दिला. परंतु,तिथे स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध नव्हते. ही बाब समजताच रुग्णालय प्रशासन आणि राहुल कोठारी यांनी प्रयत्न करुन स्त्री रोग तज्ज्ञ वर्षा जैन यांचा शोध घेतला. त्यांनी बावडियाकला येथील पुष्पांजली रुग्णालयात शिफ्ट करण्यास सांगितले. येथेच माझ्या पत्नीने सायंकाळी 5.30 वाजता बाळाला जन्म (Baby Birth) दिला. कोरोना पॉझिटिव्ह असलेली माझी पत्नी अजून रुग्णालयात असून, बाळाची देखभाल करण्यासाठी त्यास दुसऱ्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, असे शिवम दुबे यांनी सांगितले.
    First published:

    Tags: Bhopal News, Corona spread

    पुढील बातम्या