मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

पतीला रुग्णालयात दाखल करुन परतली; काही वेळाने रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह

पतीला रुग्णालयात दाखल करुन परतली; काही वेळाने रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह

देशात कोरोनानं रौद्र रुप धारण केलं आहे. मागील दहा दिवसांपासून देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद (Coronavirus in India Latest Update) होत आहे.

    उत्तर प्रदेश, 2 मे: उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील खागा पोलीस हद्दीतील वैसापूर गावात एक बनावट डॉक्टरकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यानंतर डॉक्टर रुग्णाचा मृतदेह रस्त्याच्या किनाऱ्यावर फेकून निघून गेला. किशनपूर पोलीस ठाणे हद्दीतील बरेची गावात राहणारे 55 वर्षीय श्रीचंद्र यादव यांना अचानक ताप आला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेले. दरम्यान रुग्णाची तब्येत बिघडू लागली. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्णाला शहरातील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात आहे. डॉक्टर रुग्णाला बाइकवर बसून घेऊन गेले आणि गावापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत सोडून फरार झाले. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा-कर्फ्यूदरम्यान मैत्रिणी पडल्या घराबाहेर; VIDEO मध्ये पाहा काय झालेत हाल! या घटनेनंतर पोलीस डॉक्टरचा शोध घेऊ लागले. या प्रकरणात सीओंनी सांगितलं की, किशनपूर पोलीस ठाणे हद्दीत राहणारी राणी देवीने प्रभारी निरीक्षकांकडे याबाबत तक्रार दाखल केली. आरोपी डॉक्टरने फतेहपूर येथे उपचारासाठी घेऊन जात असल्याचं सांगितलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत अवस्थेत रस्त्याच्या कडेला सोडून दिलं. देशात कोरोनानं रौद्र रुप धारण केलं आहे. मागील दहा दिवसांपासून देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद (Coronavirus in India Latest Update) होत आहे. शुक्रवारी हा आकडा चार लाखाच्या पार गेला होता. मात्र, आता काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील चोवीस तासात 3 लाख 8 हजार 522 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. पहिल्यांदाच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण (Corona Patient) बरे झाले आहेत. तर, रुग्णसंख्येतही शुक्रवारच्या तुलनेत घट झाली आहे. या चोवीस तासांमध्ये 3,684 जणांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona updates, Death

    पुढील बातम्या