मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

देशातील पहिलीच घटना; बुस्टर डोज घेतल्यानंतर डॉक्टरचं अख्खं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह

देशातील पहिलीच घटना; बुस्टर डोज घेतल्यानंतर डॉक्टरचं अख्खं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या हिच्या कुटुंबातील पाच जणांनी बुस्टर डोज घेतला होता. त्या दिवशी घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली.

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या हिच्या कुटुंबातील पाच जणांनी बुस्टर डोज घेतला होता. त्या दिवशी घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली.

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या हिच्या कुटुंबातील पाच जणांनी बुस्टर डोज घेतला होता. त्या दिवशी घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली.

  • Published by:  Meenal Gangurde

[भोपाळ, 24 जानेवारी : देशातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. बूस्टर डोज (booster dose) (प्रिकॉशन डोज) घेतल्यानंतर भोपाळमधील (Bhopal News) एका कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. विशेष म्हणजे ज्या दिवशी त्यांनी लस (Vaccination) घेतली होती, त्याच दिवशी त्यांना ताप आला होता. दुसऱ्या दिवशी सर्दी-खोकला झाला. 4 दिवसांपर्यंत असाच त्रास होत होता. शेवटी त्यांनी चाचणी केली तर रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आले. तर दुसरीकडे एका हेल्थ वर्करसोबत असाच प्रकार घडला. बुस्टर डोस घेतल्याच्या तिसऱ्या दिवशी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या सर्वजण होम आयसोलेशनमध्ये आहेत. (The first incident in the country, The whole family corona positive after taking booster dose)

बूस्टर डोज घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) झालेली डॉक्टर मोनल सिंह हिने दैनिक भास्करला याबाबत माहिती दिली. एड्स कंट्रोल सोसायटीच्या असिस्टेंट डायरेक्टर डॉ. मोनल सिंह यांनी सांगितलं की, तिचा डॉक्टर पती, आई सरयू, वडील HS पटेल (पीपल्स मेडिकल कॉलेजचे CEO)आणि बहीण रचना पटेल आम्ही सर्वांनी दोन लशी घेतल्या आहेत. यानंतर 15 जानेवारी रोजी सिहोरच्या श्यामपुरमध्ये सर्वांना बुस्टर डोस देण्यात आला. रात्री सर्वांना ताप आला. मात्र टेस्ट केली नव्हती. दुसऱ्या दिवशी सर्दी-खोकला सुरू झाला. त्रास वाढत असल्याने 19 जानेवारी रोजी पतीची कोरोना चाचणी केली. त्याच दिवशी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर सर्वांनी चाचणी केली. तर सर्वांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

हे ही वाचा-CoWIN Portal मध्ये मोठे बदल, आता एकाच नंबरवर इतक्या लोकांना करता येईल लसीकरण!

होम आयसोलेशनबाबत डॉक्टरने सांगितलं की, ते नियमित औषधं घेत आहेत. पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात त्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यावेळी त्यांची प्रकृती खूप जास्त बिघडली होती. ऑक्सीजन लेव्हल 80 ते 90 दरम्यान घटला होता. पल्स रेट 40 ते 50 दरम्यान होता. 10 दिवसांनंतर पुन्हा टेस्ट केली तर त्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. मात्र तिसऱ्या लाटेत खूप बदल झाले आहेत. दोन्ही डोस आणि बुस्टर डोसमुळे मोठा बदल झाला आहे. पहिल्याच्या तुलनेत आता माझी प्रकृती ठीक आहे.

भोपाळमध्ये रुग्णवाहिका 108 मध्ये काम करणारे हेल्थ वर्कर धर्मेंद्र चौरसिया यांनी 12 जानेवारी रोजी बुस्टर डोज घेतला. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांनी चाचणी केली तर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. मात्र त्यानंतर नियमित औषधं घेतली. त्यामुळे आता त्यांची प्रकृती बरी आहे.

First published:

Tags: Bhopal News, Corona patient, Corona vaccination, Madhya pradesh